काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राम मंदिरासाठी विटा पाठवणार

प्रतिनिधि/दी.4
काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मंदिर निर्माणाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे. राजीव गांधी यांना सर्वाधिक आनंद झाला असता, असे सांगून ते म्हणाले, की प्रभू राम सर्वांचे आहे, राजीव गांधींनी १९८५ मध्ये याची सुरुवात केली होती. १९८९ मध्ये शिलान्यास केला होता, राजीव गांधी यांच्यामुळेच राम मंदिराच्या निर्माणाचे स्वप्न साकार होत आहे. राम मंदिराच्या निर्माणासाठी राज्यातील जनतेकडून ११ चांदीच्या विटा पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली

Back to top button