अतिसंक्रमित क्षेत्रात वाढदिवस साजरे करणे पडले महागात
धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा केला

राजगुरूनगर/दि. ६ -राजगुरूनगर तालुक्यातील शिरोली गावच्या उपसरपंच महिलेने ग्रामपंचायत कार्यालयात केलेला वाढदिवस त्यांना चांगलाच महागात पडला आहे. गावात कोरोनाचे दहा रुग्ण असल्यामुळे गाव अति संक्रमित क्षेत्रामध्ये असताना या उपसरपंच महिलेने सामाजिक अंतर भानाचे नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा केला. आता त्यांच्यासह अन्य कार्यकत्र्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.