पायलट यांच्या माध्यम सल्लागारांवरील कारवाईला उच्च न्यायालयाची स्थगिती

जयपूर/दि. १६ – माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे मीडिया व्यवस्थापक लोकेंद्र सिंह यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यास राजस्थान उच्च न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने केस डायरी समन्स बजावली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या जयपूर खंडपीठाचे न्यायाधीश गोवर्धन बहाद्दार यांनी शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी केली. अधिवक्ता एस.एस. होरा यांनी लोकेंद्रqसग यांची बाजू मांडली. उच्च न न्यायालयाच्या आदेशानंतर आता आमदार पुरी पोलिस ठाणे १८ नोव्हेंबरपर्यंत लोकेंद्र qसहला अटक करू शकणार नाही किंवा इतर कोणतीही कारवाई करू शकणार नाही. सिंह यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की जैसलमेरच्या हॉटेलमधील आमदारांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप खोटा असून पोलिसांनी दुर्भावनायुक्त भावनेतून कारवाई केली आहे. पत्रकार म्हणून फोन टॅपिंगची बातमी आपल्याला मिळाली, तसेच इतर वाहिन्यांवरही ती बातमी दिसली होती. पत्रकार म्हणून फोन टॅपिंगची माहिती देणे, हा गुन्हा नाही. फोन टॅपिंग होत असलेल्या आमदारांच्या नावांची यादीही व्हायरल झाली होती. तथापि, सरकारने हे अहवाल नाकारले; परंतु अलीकडेच पोलिस ठाण्याचे प्रभारी सुरेंद्र पंचोली यांनी आमदार पुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि त्यात लोकेंद्र सिंह आणि एका राष्ट्रीय वाहिनीच्या पत्रकाराने विना तथ्य फोन टॅप केल्याची दिशाभूल करणारी बातमी चालविली, असा आरोप केला.





