जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘व्हिएमव्ही’ची पाहणी

रोजगारनिर्मितीसाठी भरीव उपक्रम राबवा

अमरावती/दि. ५ – शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था ही मोठी परंपरा असलेली व महत्वाची संस्था आहे. जिल्ह्यात नवतरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी संस्थेने भरीव उपक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेची पाहणी जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे संचालक डॉ. हेलावी रेड्डी यांच्यासह प्राध्यापकवृंद उपस्थित होता.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, संस्थेतर्फे रोजगारनिर्मितीच्या अनुषंगाने उपक्रम राबवावेत. विशेषतः विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनपर उपक्रम सातत्याने व्हावेत.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी परिसरातील विविध विभागांची व परिसराची पाहणी केली.
Back to top button