वरुड । ४ डिसेंबर- अवैध दारु विक्रीसाठी घेवुन जात असतांना स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी वाहनासह दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाहीमुळे शहरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सापळा रचून शहरातील महात्मा गांधसी चौक परिसरात एका देशी दारूच्या दुकानातुन दुचाकीवर दोन ईसम अंदाजे ६ पेट्या नेतांना आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले असुन आरोपीमध्ये रमाकांत मधुकर ब्राम्हणे (३४) रा.जरुड, तेजस जगदीश माकोडे (३४) रा.धनोडी या दोघांना अटक केली असुन त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाही करण्यात आली आहे.
वरुड हद्दीत पेट्रोलिंग करीत असता गुप्त माहीतीदाराकडून खबर मिळाली की, वरील नमूद आरोपी हे आपले मोटार सायकलवर केदार चौककडून अवैद्य देशीदारुची वाहतुक करीत आहे. अशा माहीती वरून धाड टाकली असता आरोपीच्या ताब्यातून देशी दारु पावटया ६०० नग पावट्या व एक मोटरसायकल असा एकूण ८० हजार रुपयांच्या मुद्देमालासह आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात घेवुन वरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कार्यवाही पोलिस निरिक्षक तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक आशिष चौधरी, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संतोष मुंदाने, रविंद्र बावणे, बळवंत दाभने, पुरषोत्तम यादव, दिनेश कानोजिया, पंकज फाटे, चालक नितीन कळमकर यांनी केली.