अमरावतीमहाराष्ट्र

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा

अमरावती विभागातील 53 व्यक्ती व 12 संस्थांचा समावेश

राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या कडुन पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्था यांचे अभिनंदन
अमरावती/दि.12- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य  करणारे समाजसेवक / व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-20, 2020-21, 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर पद्मश्री दादासाहेबभाऊरावकृष्णराव गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांची शासनाने घोषणा केली आहे.त्यामध्येअमरावतीविभागातीलएकूण37व्यक्ती व 8संस्थांचासमावेशआहे.
 पुरस्करासाठी निवड करण्यात आलेल्या सर्व प्राप्त व्यक्ती व संस्थाचे राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथशिंदे,उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे, सचिव, श्री सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त, श्री.ओम प्रकाश बकोरिया,अमरावतीविभागाचेप्रादेशिकउपायुक्तसुनिलवारे,यांनीअभिनंदनकेलेआहे.
राज्यातील एकूण 393  पुरस्कारार्थ्यांची निवडया चार वर्षाचे पुरस्कारा करीता करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील 37 व्यक्ती 08 संस्थांचा समावेश आहे. त्यामध्येसन 2019-20 मध्ये2 व्यक्ती, 2020-21 मध्ये19व्यक्ती व 1 संस्था, 2021-22मध्ये08व्यक्ती व 4संस्था व 2022-23मध्ये 8 व्यक्ती व 3 संस्थायांचा समावेश आहे. कोरोनाकालावधी असल्याने गेले 3-4 वर्षाचे पुरस्कार जाहिर होऊ शकले नव्हते, मात्र आता शासनाने सर्व पुरस्कारांची घोषणाकेली आहे. मुंबई येथील नॅशनल सेंटरफॉ रपरफॉर्मींग आर्टस, जमशेद भाभानाटयगृह, एनसीपीए मार्ग, नरीमनपॉइंट, मुंबईयेथेदिनांक 12 मार्च, 2024 रोजीसकाळी11.00 वाजताराज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, यांचे हस्ते तसेच मुंबईचे पालकमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये वितरण सोहळा संपन्न होत आहे. राज्यात समाज कल्याण क्षेत्रात मागासवर्गीयांच्या उन्नती साठी शिक्षण, आरोग्य, अन्यायनिर्मुलन, जनजागरण इत्यादी क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तीं पुरस्काराच्या निमित्ताने गौरवशासनाचे वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे समाजातील सर्वस्थरातून शासनाचे आभार व्यक्तकरून निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
सदर पुरस्कारासाठी सामाजिकन्यायविभागाच्यावतीने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तींना मुंबई येथेकार्यक्रमठिकाणी घेऊन जाणे यासाठी संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.  पुरस्कारार्थी यांची निवास,भोजन वमुंबईदर्शनाची शासनाच्या वतीने व्यवस्थाकरण्यात आली आहे. एका पुरस्कारार्थी सोबत एक व्यक्ती असे दोन जणांना विशेष निमंत्रित म्हणून पुरस्कार स्वीकारण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. सर्व पुरस्कारार्थी यांचे राज्यातील समाज कल्याण विभागाचे समाजकल्याणअधिकारीप्रत्यक्ष पुरस्कारार्थी यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदनकरीतआहेत.कार्यक्रमाचेनियोजनाकरीता मुंबईमध्ये हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या सर्व कार्यक्रमांचे / पुरस्कार वितरण सोहळयाचे नियोजन काटेकोर पद्धतीने होण्यासाठी विभागाचे सचिव, सुमंत भांगे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी विविध बैठका घेऊन अधिकाऱ्यांना निर्देशित केले आहे.सचिव सामाजिक न्याय व आयुक्त,समाज कल्याण यांचे मार्गदर्शना खाली विभागाचे सहसचिव, सोमनाथ बागुल, उपसचिव रविंद्र गोरवे, मुंबई प्रादेशिक विभागाच्या उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार, समाधान इंगळे व त्यांच्या टीमकडून नियोजन करण्यात येत आहे.
अमरावती विभागातील पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्थायाची संख्या व पुरस्काराचे स्वरुप खालील प्रमाणे.
अमरावती विभागातील सन 2019-20ते 2022-23 या वर्षातील पुरस्कारार्थी ची संख्या पुरस्काराचे स्वरुप
अ.क्र. पुरस्काराचे नाव व्यक्तींची संख्या संस्थांची एकूण संख्या एकूण संख्या व्यक्ती संस्था
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार. 30 व्यक्ती व संस्था 4 असे विभागामध्ये 34
( पुरस्काराचे स्वरूप) एकुण 51 व्यक्तींना प्रत्येकी रु.15000/-एकूण 10 संस्थांना
प्रतीसंस्था रु.25000/-
2. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 6 व्यक्ती व 1 संस्था विभागामध्ये 7 (पुरस्काराचे स्वरूप)
एकुण 25 व्यक्तींनाप्रत्येकी रु.25000/- एकूण 6 संस्थांना प्रतीसंस्था रु.50000/-
3. कर्मवीर पद्मश्री दादासाहेबभाऊरावकृष्णराव गायकवाड पुरस्कार 1 व्यक्ती .(पुरस्काराचे स्वरूप) येत व्यक्तींला रु.21000/- एकूण 1 संस्थेला रु.30000/-रू दिले जातात.
4. संत रविदास पुरस्कार 0 0 0 एकूण 1 व्यक्तींला रु.21000/-अमरावती विभागामध्ये 1 संस्थेला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
(पुरस्काराचे स्वरूप) संस्था रु.30000/-
5. शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक अमरावती विभागातील तीन संस्थांची निवड झाली आहे. (पुरस्काराचे स्वरूप)एकूण 12 संस्थेला 6 महसुलीविभागानूसारप्रत्येकीदोनसंस्था रु.7.50 लक्षसन्मानपत्र, मानपत्रासाठीचांदीचास्क्रोल,स्मृतीचिन्ह , शाल, व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येतो.
6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य पुरस्कार राज्यस्तरावर 3 पुरस्कार दिले जातात यामध्ये प्रथम पुरस्कार 5 लक्ष, द्वितीयपुरस्कार -3 लक्ष व तृतियपुरस्कार -2 लक्ष विभागीयस्तरावर पुरस्कार संख्या 18,प्रत्येकी रु.1.00 लक्ष. इतकी रक्कम वितरित करण्यात येते. आपल्या अमरावती विभागातील एकूण37व्यक्ती व 8 संस्थाअसे एकूण45व्यक्तींना या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग अमरावती यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सुनिलवारे, प्रादेशिकउपायुक्त,
समाजकल्याण,विभाग,अमरावती

Related Articles

Back to top button