अमरावती
विश्व ब्राम्हण दिवस परिवारासोबत साजरा करण्याचे आवाहन
पूजापाठ व दिवे लावून पूर्वजांचे स्मरण करा
अमरावती/दि.३०– जून रोजी विश्व ब्राम्हण दिवस असून लॉकडाऊन असल्याने सर्व ब्राह्मणांनी हा दिवस घरीच परिवारासोबत साजरा करण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय ब्राम्हण सेवा संस्थान चे जिल्हा महासचिव पं. कुमुद पांडेय (शास्त्री) यांनी केले आहे. घरी पूजापाठ व रात्री दिवे लावून आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचे देखील आवाहन याद्वारे करण्यात आले आहे.
ब्राम्हण दिवस हा आपल्यासाठी गौरव दिवस असून सर्वांनी या दिवशी आपल्या मुलांना सनातन संस्कृतीशी जोडावे,पूर्वजांची देणं असलेले वेद, पुराण,उपनिषद, रामायण,गीता,गंगा गायत्री तसेच पूर्वजांचे स्मरण करून भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन हवन करावे व आशीर्वाद प्राप्त करावे.लॉकडाऊन असल्याने कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन शक्य नसल्याने प्रत्येक ब्राम्हण परिवाराने हा गौरव दिवस थाटात साजरा करावा असे आवाहन देखील पं. कुमुद पांडेय यांनी केले आहे.