अमरावती

लोणी बलात्कार व खुन प्रकरणातील आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी!

गावगुंडानीं तिच्यावर सामूहिक बलात्कार करूननिर्घृण खून केल्याची बाब उघडकीस आली

अमरावती/दी12-अमरावती जिल्ह्यातील लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत माहेरी आलेल्या मातंग समाजाच्या महिलेचा गावातील गावगुंडानीं तिच्यावर सामूहिक बलात्कार करूननिर्घृण खून केल्याची बाब उघडकीस आली या घटनेत पोलीसानी  भा.द.वि. चे कलम ३७६, ३७६(ए) व ३०२ नुसार गुन्हा नोंद केला परंतु आरोपींचा शोध घेवून अटक करण्यात आली नाही.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पिडीत महिला ही मातंग समुहातील असून आरोपींनी सामुहीक बलात्कार करुन खुन केल्याची बाब स्पष्ट झाली आहे. पोलीस स्टेशन लोणी अंतर्गत गुन्हयाची नोंद झाली असली तरी
अजुनपर्यंत कोणत्याही आरोपींना सदरचे गुन्हयात अटक करण्यात आली नाही.
अत्यंत महत्वाची बाब म्हणजे पिडीत कुटुंबातील व्यक्तींशी केलेल्या चर्चे नंतर व प्रकरण समजुन घेतल्यानंतर असे दिसते की या प्रकरणामध्ये उघडयावर संडासला जाणाऱ्या महिलांना टारगेट करुन त्यांचेवर
अत्याचार करणारी टोळी या परिसरात असू शकते. पिडीत महिला ही घरा शेजारी जंगल परिसरात संडासला गेली असता तिचेवर
सामुहीक बलात्कार व खुन झाल्याची बाब स्पष्ट झालेली आहे. असे असतांनासुध्दा अजुनपर्यंत सामुहीक बलात्काराचे कलम सदर गुन्हयामध्ये लावण्यात आलेले नाही. तसेच अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याचे कलम लावण्यात आले नाही
सदरच्या गुन्हयामध्ये आरोपोंचा शोध घेवुन त्वरीत अटक करणे आवश्यक असतांना सुध्दा अजुनपर्यंत कोणत्याही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. आरोपी हे महिलांची छेड व शोषन करणारी सराईत गुन्हेगारी
मानसिकतेची असल्याची बाब स्पष्ट होत आहे. त्यामुळे पिडीत महिला व कुटूंब हे मातंग समुहातील अनुसूचित जातीचे असल्यामुळे त्यांना रक्कम रुपये ५० लाखाची आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा प्रस्ताव त्वरीत शासनाला पाठवावा अश्या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ अमरावती यांना देण्यात आले यावेळी
यावेळी अमरावती वकील संघाचे ॲङ सिध्दार्थ गायकवाड, अँड. संजय वानखडे, अँड. रमेश  तंतरपाडे, ॲङ प्रकाश खंडारे, ॲङ भूषण खंडारे, अँड. सुनील डोंगरदिवे, अँड. सुधीर तायडे, अँड. शशी गवई,अँड. रवि वरठी, अँड. विकास गवई, अँड. संघपाल आढव ईत्यादी हजर होते.

Related Articles

Back to top button