अमरावती

विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सेलची स्थापना

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर विविध महाविद्यालयांमध्ये सेमिनार

विद्यापीठाद्वारे शिक्षकांमध्ये जनजागृती
अमरावती/दी १५- केंद्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संपूर्ण देशभरामध्ये लागू केले आहे.  या धोरणाची अंमलबजावणी विद्यापीठाच्या माध्यमातून करण्याकरिता विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जनजागृती शिक्षकांमध्ये करावी, असे निर्देश दिले.  त्यानुसार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सेलची स्थापना करण्यात आली आहे.  या सेलमध्ये शिक्षण विभागप्रमुख डॉ. गजानन गुल्हाने, उपयोजित परमाणू विभागप्रमुख डॉ. संजय डुडूल, संगणकशास्त्र विभागातील डॉ. मोहम्मद अतीक यांचा समावेश आहे.
 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची विद्यापीठाशी संलग्नित पाचही जिल्ह्रांच्या महाविद्यालयांतील तसेच विद्यापीठ शैक्षणिक विभागातील शिक्षकांना माहिती व्हावी आणि ते माहितगार झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत या धोरणाची माहिती पोहचावी, हा यामागचा उद्देश असून त्यादृष्टीने विद्यापीठातील सेलच्या माध्यमातून पाचही जिल्ह्रांतील महाविद्यालयांमध्ये सेमिनारचे आयोजन करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा, विद्याभारती महाविद्यालय, अमरावती, राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल विज्ञान महाविद्यालय, अकोला व इन्नानी महाविद्यालय, कारंजा या महाविद्यालयांमध्ये सेमिनार संपन्न झाले, त्यामध्ये आर.डी.जी. महिला महा., अकोलाच्या डॉ. रूपा गुप्ता, यवतमाळचे डॉ. नितीन खर्चे, महिला महाविद्यालय, अमरावतीचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, नागपूरचे डॉ. राजेश वैष्णव, डॉ. स्मिता आचार्य व डॉ. डी.एन. मोरे या वक्त्यांनी मार्गदर्शन केले.  दुस­या टप्प्यात शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला, श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोला, श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावती व महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावती या महाविद्यालयांमध्ये, तर तिस­या टप्प्यात सिपना कॉलेज ऑफ इंजि. अॅन्ड टेक्नॉ., अमरावती, राजस्थान आर्या कला, श्री मिठूलालजी कचोलिया वाणिज्य आणि श्री सत्यनारायणजी रामकृष्णजी राठी विज्ञान महाविद्यालय, वाशिम, जी.एस. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव, स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रो. नारायणराव गावंडे विज्ञान आणि आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय, साखरखेर्डा, लोकमान्य तिळक महाविद्यालय, वणी या महाविद्यालयांमध्ये सेमिनार संपन्न होईल.  याशिवाय जवळपास सर्वच महाविद्यालयांमध्ये या सेमिनारचे आयोजन करण्यात येणार असून सामुहिक चर्चा सुद्धा घडवून आणल्या जाणार आहे.

Related Articles

Back to top button