अमरावती/दी.२१- विविध न्याय्य मागणीसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर असून, आजचा संपाचा पाचवा दिवस आहे. शासनाने दखल न घेतल्यास संप अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकायांनी दिला आहे. आज विद्यापीठ मुख्य प्रवेश द्वारा समोरील आंदोलनमंडपाला माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा विद्यापीठ शिक्षक मंचचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खेडकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रफुल्ल गवई, नुटा संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी, प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी भेट दिली.
संपकयांना संबोदीत करतांना डॉ. अनिल बोंडे म्हणाले, विद्यापीठ कर्मचायांच्या 796 पदांना 7 वा वेतन आयोग, आ·ाासीत प्रगती योजना लागू करणे, 58 महिन्यांची थकबाकी देणे, 5 दिवसांचा आठवडा यांसह अन्य मागण्यांकरिता विरोधी पक्ष नेते यांच्या माध्यमातून विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचायांच्या मागण्यांचा प्रश्न अधिवेशनात तातडीने लावण्यात येईल. इतर शासनाच्या विभागांना जे दिलेे आहे, तेच देण्याबाबत विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचायांची मागणी न्याय्य आहे. शासन स्तरावरती या मागण्या मंजूर करुन घेण्यासाठी विरोधी पक्षातर्फे सर्वोतपरी प्रयत्न करण्याचे आ·ाासन त्यांनी यावेळी दिले.
विद्यापीठ शिक्षकमंचचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खेडकर यांनी सांगितले, आमच्या संघटनेच्यावतीने शासनापर्यंत सर्व मागण्या पोहोचवल्या जातील व त्या मान्य करण्याचा आग्रह धरण्यात येईल. डॉ. प्रफुल्ल गवई म्हणाले शासनाने तातडीने संपाची दखल घेवून संपकयांसोबत चर्चा करावी व तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा. नुटा संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रविण रघुवंशी म्हणाले विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचायांच्या मागण्या न्याय्य असून शासनाने त्या त्वरीत मान्य करणे आवश्यक आहे. यापूर्वी सुध्दा संप करण्यात आला होता, त्यावेळी शिक्षण मंत्र्यांनी मागण्या पुर्ण करण्याचे आ·ाासन दिले होते. एक वर्षा पेक्षा जास्त कालावधी होवूनही मागण्या मंजूर झाल्या नाही जोपर्यंत मागण्या मंजूर होणार नाही, तोपर्यंत संप सुरू ठेवावा. संपास नुटा संघटनेचा संपूर्ण पाठींबा आहे.
भाजपाचे पदाधिकारी माजी राज्यपाल नामीत व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी सुध्दा यावेळी भेट दिली व पाठींबा दर्शविला. यावेळी मागासवर्गीय विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. नितीन कोळी, ऑफीसर फोरमचे अध्यक्ष डॉ. शशीकांत रोडे, सचिव डॉ. विलास नांदुरकर, विद्यापीठ कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष श्री संजय ढाकूलकर, महासचिव श्री विलास सातपुते संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ¬ा संख्येने उपस्थित होते..
विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज ठप्प
विद्यापीठ कर्मचायांनी गेल्या पाच दिवसांपासून पुकारलेल्या बेमूदत आंदोलनामुळे विद्यापीठाचे कामकाज ठप्प झाले आहे. संपात जवळपास शंभर टक्के कर्मचारी सहभागी आहेत. त्यामुळे विद्यापीठातील सर्व विभागांचे काम ठप्प झाले असून त्याचा फटका विद्याथ्र्यांना सहन करावा लागत आहे. कर्मचारी संघटनेची विद्यार्थी विरोधी भूमिका नाही, विद्याथ्र्यांना होत असलेल्या त्रासाची तसेच ठप्प पडलेल्या प्रशासकीय कामकाजाची नोंद शासनाने घ्यावी व कर्मचायांच्या मागण्या पूर्ण कराव्या असे आवाहन महाराष्ट्र विद्यापीठ महासंघाचे तथा विद्यापीठ व महाविद्यालय सेवक संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष श्री अजय देशमुख यांनी केले आहे.