अमरावती

शिस्त आणि शांततेत दिला बाप्पाला निरोप

१७ गणेश मंडळांच्या बाप्पांचे विसर्जन

नांदगांव पेठ दी ३ – कोणत्याही प्रकारचे वाद्य न वाजवता गणेश भक्तांनी शिस्त आणि शांततेत बुधवारी लाडक्या बाप्पाला निरोप दिला.नांदगांव पेठ येथील १७ ही गणेश मंडळाचे एकाच वेळी विसर्जन करण्यात आले असून गणेश भक्तांनी शासनाचे नियम पाळत तसेच पोलिसांना सहकार्य करीत अत्यंत साध्या पद्धतीने गणेश विसर्जन केले. पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण आणि त्यांचा ताफा यावेळी सकाळपासून तैनात होता मात्र गणेशभक्तांनी शासनाच्या नियमांचे पालन करून बाप्पाला श्रद्धापूर्वक निरोप दिला.
बुधवारी सकाळी सर्व गणेश मंडळांनी बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात केली.पोलिसांच्या वतीने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात केली. दरवर्षी प्रचंड गर्दी, ढोल ताशे व अन्य वाद्यांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात येतो मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे राज्य शासनाने गणेशभक्तांसाठी नियमावली तयार केली होती. त्या नियमांचे पालन करीत बुधवारी सकाळी ९ वाजता पासून गणेश विसर्जनाला सुरुवात करण्यात आली. पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण आणि त्यांच्या ताफ्याने यावेळी चोख बंदोबस्त लावला होता.
रामगंगा नगर येथील ईगल गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सर्वात शेवटी गणेश विसर्जन केले. कार्यकर्त्यांनी मास्क लावून तसेच सॅनिटाईजरचा वापर करून बाप्पाची साध्या पद्धतीने मिरवणूक काढली. सामाजिक संदेश देत तसेच सामाजिक अंतर राखून काढलेली मिरवणूक आकर्षण होती.

Related Articles

Back to top button