अमरावतीमराठी

ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती व्यक्तिमत्व विकासाचा प्रवास – कुलसचिव

अमरावती/दी/३१- जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, त्याकरिता विद्याथ्र्यांनी आपले ध्येय ठरवून जीवनात येणा­या अडचणींवर मात करुन प्रत्येक परीक्षेला सामोरे गेले पाहिजे.  ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती हा व्यक्तिमत्व विकासाचा प्रवास असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले.  विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात नुकतेच रसायनशास्त्र मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले, त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. आनंद अस्वार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. दिनेशकुमार सातंगे, संयोजिका डॉ. जागृती बारब्दे, रसायनशास्त्र मंडळाचे अध्यक्ष अनुराज चव्हाण उपस्थित होते.मार्गदर्शन करतांना कुलसचिव डॉ. तुषार देशमुख म्हणाले, विद्याथ्र्यांनी आयुष्यात चांगल्या संधीची वाट न पाहता आलेल्या संधीचे सोने करावे.  ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती हा व्यक्तिमत्व विकासाचा प्रवास असून तो यशस्वी पूर्ण करायचा असेल, तर कठोर तपश्र्चया करावी लागते.  सातत्य, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न ही यशाची त्रिसूत्री असून आत्मवि·ाास आणि कठोर परिश्रम अपयश नावाचा रोग मारण्यासाठी सर्वात प्रभारी औषध असल्याचेही ते यावेळी म्हणाले.संचालक डॉ. दिनेशकुमार सातंगे म्हणाले, परिवर्तन घडवून आणण्यासाठी चिकाटी आणि परिश्रमाची गरज असून प्रत्येकामध्येच जगाला बदलण्याचे सामथ्र्य आहे.  विद्याथ्र्यांनी आपल्या व्यक्तिगत शक्तीला ओळखून जगासमोर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.  याप्रसंगी त्यांनी विद्यार्थी विकास विभागामध्ये विद्याथ्र्यांकरिता राबविण्यात येणा­या विविध विद्यार्थीहितार्थ योजनांची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात विभागप्रमुख डॉ. आनंद अस्वार म्हणाले, रसायनशास्त्र मंडळ हे विद्याथ्र्यांनीच विद्याथ्र्यांना उपलब्ध करुन दिलेले एक व्यासपीठ असून विद्याथ्र्यांचा अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या अंगी असेलेले सुप्त कलागुण, कौशल्यांना वाव मिळावा, त्यांचा आत्मवि·ाास वाढावा, हाच रसायनशास्त्र मंडळाचा महत्तम उद्देश आहे.  याप्रसंगी त्यांनी रसायनशास्त्र मंडळाची कार्यकारिणी घोषित केली, त्यामध्ये अध्यक्षपदी अनुराज चव्हाण, उपाध्यक्षपदी कु. पायल शर्मा, सचिवपदी कु. धनश्री वाघमारे, कोषाध्यक्षपदी कु. सायली मोतेवार, तर सहसचिवपदी जयंत चांदुलवार याशिवाय प्रभारित शिक्षक म्हणून डॉ. स्वाती गाडखे, प्रा. पायल कडू व प्रा. अंबिका पाठक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.कार्यशाळेची सुरुवात माता सरस्वती व कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.  प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ. जागृती बारब्दे यांनी, रसायनशास्त्र मंडळातर्फे वर्षभर राबविण्यात येणा­या विविध उपक्रमाची माहिती मंडळाचे अध्यक्ष अनुराज चव्हाण यांनी, मागील वर्षाच्या कार्यक्रमाचे अहवाल वाचन मंडळाच्या सचिव कु. धनश्री वाघमारे हिने, सूत्रसंचालक कु. करिष्मा सय्यद,  तर आभार कु. पायल शर्मा हिने मानले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील शिक्षक व विद्याथ्र्यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button