अमरावती

अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील भागात गारपीट

वादळी पावसाने शेतकऱ्यांऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान

  • खासदार नवनीत रवी राणा यांनी  शेतामध्ये जाऊन केली पाहणी

  • नुकसानभरपाई बाबत पंचनाने करून शासनाने आर्थिक मदत मंजूर करावी

अमरावती/दि २१ – गेल्या तीन दिवसापासून अमरावती जिल्ह्याच्या चांदुर बाजार, अचलपूर, अमरावती, मोर्शी, चिखलदरा, धारणी,दर्यापूर, नांदगाव .खंड. ,धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे,  तालुक्यामध्ये   अनेक भागांमध्ये शेतशिवारात गारपीट  वादळ पावसाने वादळासह जोराचा पाऊस सुरू  आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील  गहू.पपई .संत्रा व पालेभाज्या इतर पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्या अनुषंगाने  अनेक शेतकऱ्यांनि झालेल्या नुकसानिबाबत  खासदार नवनीत राणा यांना भेटून  यांच्याशी संवाद साधून त्यांच्या  शेतामधील पिकाचे  झालेल्या नुकसानीच्या संबंधी समस्या मांडल्या.झालेल्या नुकसानिबाबत खासदार नवनीत रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील नुकसानग्रस् शेतकऱ्यांनच्या शेतांमध्ये जाऊन पाहणी केली.
पुन्हा  आज रात्री गारपिटीमुळे वादळ जोरदार पाऊस येऊन  नांदगाव पेठ शेतशिवारातील अनेक शेतकऱ्यांनचें शेतीमधील नुकसान झाले आहे.आज खासदार नवनीत रवी राणा हया शेतकऱ्यांनचें बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. गेल्या सतत03 दिवसांपासून खासदार नवनीत राणा संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेला नुकसानीबाबत पाहणी करत आहेत या अनुषंगाने खासदार नवनीत राणा यांनी अमरावती  जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित केले की ०१ वर्षांपासून कोरोना संकट सुरू आहे त्या कारणाने आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची खराब आहे.पुन्हा हे नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांनचें उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. अश्या  शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शासकीय यंत्रणा चे अधिकाऱ्यांनी जाऊन  नुकसानीबाबत
पीक पाहणी करून पंचनामा करावे व सरकारला आर्थिक सहाय्य मोबदला मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवावा जेणे करून या कोरोणाच्या संक्रमणामध्ये आर्थिक हतबल झालेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून नुकसानीबाबत आर्थिक साहाय्य मिळेल याबाबतचे जिल्हाधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत आज रोजी नांदगाव पेठ शेतशिवरतील झालेल्या नुकसानीचे  शेतमालक बनासुरे,सियद् जुनेद,सज्जद भाईअभिजित धर्माळे ,यादव, खान,शेख अन्सार,हर्षद ठाकूर,शेजसभाई,मनानं भाई, आदी शेतकरी व मंडल अधिकारी धोटे,  कृषी अधिकारी व तलाठी पाठक उपस्थित होते.  नुकसान झाल्याच्या शेतमालक यांनी  उपस्थित राहून झालेल्याशेतपिकांचे नुकसानीचे हाल  .खासदार नवनीत राणा .यांना दाखविले
Back to top button