अमरावतीमराठी

‘ओमायक्रॉन’ प्रतिबंधासाठी सुधारित निर्बंध जारी

नागरिकांनी नियमांचे पालन करावे

अमरावती, दि. ३१ : ओमायक्रॉन प्रकाराच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्‍ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या सूचना संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागासाठी आजपासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आल्या आहेत. तसे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी निर्गमित केले आहेत.त्यानुसार लग्‍नसोहळा व लग्‍नसमारंभाच्‍या बाबतीत , बंदिस्त जागा, हॉल, मेजवानी/मॅरेज हॉल इ. तसेच  खुल्‍या जागेकरिता  उपस्थितांची मर्यादा ५० पेक्षा जास्‍त ठेवता येणार नाही.  इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत, जेथे उपस्थितांची उपस्थिती बंद जागेसाठी आणि खुल्या जागेसाठी ५०  पेक्षा जास्‍त ठेवता येणार नाही. अंत्यविधीसाठी उपस्थितांची मर्यादा २० व्‍यक्‍ती एवढी मर्यादित आहे जिल्ह्याच्‍या कोणत्याही भागात जी पर्यटन स्थळे आहेत किंवा गर्दी होणा-या सार्वजनिक स्‍थळी अतिरिक्त निर्बंध लागू करण्यासाठी सक्षम अधिकारी आवश्यकतेनुसार कलम १४४ लागू करतील. मास्क, स्वच्छता व  सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्ती त्यांचेमध्ये कमीत कमी सहा फुटाचे  सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button