अमरावती

आजाराला कंटाळुन इसमाची आत्महत्या

तालुक्यातील शहापूर (पुनवर्सन) येथील घटना

वरुड १९ नोव्हेंबर – येथून जवळच असलेल्या शहापूर (पुनवर्सन) येथील पंढरी काळे नामक ७२ वर्षीय वृध्द इसमाने आजाराला कंटाळून गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
पंढरी काळे हे गेल्या काही दिवसांपासुन आजारी होते. आजारपणामुळे ते कंटाळले होते अशा स्थितीत रात्रीच्या सुमारास सर्व जण झोपी गेल्याची संधी साधत पंढरी काळे यांनी घरातीलच एका खोलीमध्ये गळफास घेवुन आत्महत्या केली. आज सकाळच्या सुमारास कुटूंबातील सदस्यांच्या ही बाब लक्षात आली. याबाबत पोलिसांना माहीती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता रवाना केला. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास वरुड पोलिस करीत आहेत.

Back to top button