अमरावतीमहाराष्ट्र

किसान पुत्र आंदोलन समिती व राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाचे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन

किसान पुत्र आंदोलन समिती व राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघ अमरावतीच्या वतीने आज अमरावती च्या पंचवटी चौक येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. 19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी कुटुंबाने नापिकी व शेतकरी विरोधी धोरणामुळे जेवणात विष कालवून सामूहिक आत्महत्या केली होती. त्यानंतर गेल्या 38 वर्षात सातत्याने शेतकरी आत्महत्या सुरूच आहे. या सर्व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी व शासन प्रशासनाचे शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती येथे 19 मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Related Articles

Back to top button