अमरावती

संत गाडगेबाबा अभ्यासिकेला राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांची भेट.

नांदगाव खंडेश्वर:- नांदगाव खंडेश्वर येथे  कार्यान्वित असलेल्या संत गाडगेबाबा अभ्यासिकेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुशील गावंडे यांनी भेट देऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवकांशी संवाद साधला. covid-19 च्या काळामध्ये शिक्षणाच्या व बेरोजगारीच्या समस्या अधिक प्रमाणात निर्माण झाल्यात. नोकरी संदर्भातील जाहिराती मध्ये पोलीस भरती, आरोग्य विभाग, एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, आई बी या सारख्या नोकरीच्या संदर्भातील संधी विद्यार्थ्यांना आहेत.संत गाडगेबाबा अभ्यासिकेच्या माध्यमातून नांदगाव खंडेश्वर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही सुविधा संचालक कणसे सर देतात त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने स्पर्धा परीक्षा पुस्तक. व विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ.सुशील गावंडे ,राष्ट्रवादी काँग्रेस कला क्रीडा सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष  प्रा.डॉ.राजेंद्र हावरे , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक प्रवीण भेंडे, अजिंक्य तऱ्हेकर,
राजेश भोयर,कैलास गावंडे, रवी भोयर , मनोज गावंडे इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button