अमरावतीमराठी

गणोरी येथे शरद क्रीडा महोत्सवाचे आयोजन

शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन

भातकुली/दी12 -पद्मभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आदरणीय प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूबभाई शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांतदादा वर्पे, निरीक्षक करणभाऊ ढेकळे , प्रा . सुशिल गावंडे  जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या मार्गदर्शनात शरद क्रिडा महोत्सव साजरा करण्यात येत आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भातकुली तालुकाध्यक्ष अमोलपाटील भारसाकळे यांनी दोन दिवस लेदरबाँल क्रिकेटचे महंमदखान महाराज क्रीकेट मैदान गणोरी ता. भातकुली येथे आयोजन केले होते.
पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस हा शरद क्रीडा महोत्सवाचे आयोजन करून साजरा करण्यात यावा यासाठी कोवीड नियमाचे पालन करुन व त्याबाबतीत दक्षता घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भातकुली तालुकाध्यक्ष अमोल पाटील भारसाकळे यांनी गणोरी येथे हे आयोजन केले होते यामध्ये अमरावती येथील श्री क्रिकेट अकँडमी व गणोरी येथील आदर्श क्रिकेट अकँडमीमध्ये चुरशीची लढत झाली त्यात गणोरी येथील चमु विजयी झाली विजयी व उपविजयी चमुला अमोलपाटील भारसाकळे व गावकऱ्यांच्या हस्ते चषक देण्यात आले.विनोद शामकुवर व रमेश तायडे यांच्या हस्ते मँन आँफ दी मँच व बेस्ट पर्फाँमर हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी विजय चव्हाण, नजर शहा,अमोल मोडक,विनोद शामकुवर,भुषण माहुलकर,विशाल चवरे,अरशीद शहा,रमेश तायडे,सुधाकर आमडरे,बंडु माहुलकर, वजीर शहा, साहील सोळंके, जय देशमुख.आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button