अमरावती

21 जूनला आतंरराष्ट्रीय योग दिनाचे ऑनलाईन पध्दतीचे आयोजन

अमरावती, दि. 19 : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्यावतीने 21 जून रोजी ‘आतंरराष्ट्रीय योग दिन’ जागतिक स्तरावर साजरा होत आहे. त्यानिमित्ताने अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर सर्व शालेय विद्यार्थी, युवकांमध्ये, नागरिकांमध्ये जाणिव जागृती करणे व योग विषयक आवड निर्माण करुन योग संदर्भात प्रचार व प्रसार करण्यासाठी 21 जूनला सकाळी 7 ते 8 दरम्यान ऑनलाईन पध्दतीने लाईव्ह आतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्त जिल्ह्यात मुख्य कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुल, अमरावती येथून गुगल मिट अप्सद्वारे ऑनलाईन पध्दतीने लाईव्ह योग दिन साजरा होणार आहे. यात जिल्ह्यातील सर्वांनी सहभागी होण्याचे क्रीडा विभागाव्दारे आवाहन करण्यात आले आहे. यात सहभागी होण्यासाठी आयोजन समितीच्यावतीने   (https://meet.google.com/wgf-gpyp-rpl) लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या लिंकच्या माध्यमातून योग व प्राणायम या कार्यक्रमाचा लाभ घेण्यात यावा.
यावर्षी कोविड 19 संर्सगजन्य साथीमुळे दरवर्षी प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन न करता, 7 वा जागतिक योग दिन उत्साहात साजरा होण्यासाठी तसेच कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हींग, वंदे मातरम् योग प्रसारक मंडळ, भारत स्वाभिमान ट्रस्ट, पंतजली योग समिती, जिल्हा आशु तू डो आखाडा, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, जिल्ह्यातील विविध योग संघटना, योगाशी निगडीत विविध स्वयंमसेवी संस्था, योग प्रेमी यांच्या वतीने जागतीक योगदिन अमरावती जिल्ह्यामध्ये साजरा करण्यात येणार आहे.
कार्यालयाच्य वतीने योगदिना निमीत्त प्रात्यक्षिके व मार्गदर्शन करीता तज्ञ मार्गदर्शक म्हणून राजुभाऊ भिमराव देशमुख, सौ.जयमाला राजुभाऊ देशमुख हे योगप्रसारक मार्गदर्शन करतील. तांत्रिक जवाबदारी संघरक्षक बडगे यांना सोपविण्यात आली आहे. तसेच जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिना निमीत्त ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र ईमेल द्वारे प्राप्त करता येईल.
तथापी शहरातील सर्व विविध शासकीय कार्यालय,एन.सी.सी., स्काउट गाईड कार्यालय, विद्यालय, महाविद्यालय, युवक, युवती, नागरीक क्रीडा प्रेमी योग समिती, क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक विद्यार्थ्यांना बहूसंख्येने योग दिना निमीत्त प्रात्याक्षिके व मार्गदर्शन कार्यक्रमाचा ऑनलाईन पध्दतीने लाभ घ्यावा.
जिल्ह्यातील विविध योग संघटनांनी व योगासनाशी निगडीत सर्व संस्था/मंडळे यांनी आपल्या स्तरावरुन ऑनलाईन अॅप्सद्वारे गुगल मिट, झुम अॅप्स व इतर व्हर्चुअल पध्दीतीने योग व प्राणायम प्रात्यक्षिके व मार्गदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरुन जागतीक योगदिनाच्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील बहुसंख्य नागरीकांना सहभागी होता येईल.  यानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांचा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करण्याबाबत आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ई.झेड खान, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तेजराव काळे व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button