अमरावतीमराठीमहाराष्ट्रमुख्य समाचार

आर. एल. पोकळे नवे आयजी, संजिता मोहपात्रा जि.प. च्या नवीन सीईओ

पोलीस आयुक्त नाविनचंद्र रेड्डी यांची आयजी पदी पदोन्नती, पोलीस आयुक्त पदावर राहणार कायम 

*  अविशांत पंडा यांची वस्त्रोद्योग महामंडळ आयुक्तपदी बदली
* विक्रम साळी यांची डीआयजी पदी मुंबई बदली
अमरावती/दि.३१ –   लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहे. अमरावती परिक्षेत्राच्या रिक्त असलेल्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर बुधवार ३१ जानेवारीला आर. एल. पोकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जयंत नाईकनवरे यांची सदर पदावरून बदली झाली होती. तेव्हापासून हे पद रिक्त होते आणि या पदाचा पदभार नागपूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे होता. राज्याच्या गृहविभागाने बुधवारी रिक्त असलेल्या विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर आर. एल. पोकळे यांची नियुक्ती केली. तसेच अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नाविनचंद्र रेड्डी यांना विशेष पोलिस महानिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आले असून सध्या त्यांना अमरावती शहर पोलीस आयुक्त पदावर कायम ठेवण्यात आले आहे. अमरावती ग्रामीण चे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांची डीआयजी म्हणून मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. तर पंकज कुमावत यांची अमरावती ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.

जि. प. चे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्या जागेवर संजिता मोहपात्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजिता विद्यमान स्थितीत आदिवासी विकास प्रकल्प डहाणू जि. पालघर येथे विशेष प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहे. अविशांत पंडा यांची नियुक्ती नागपूर येथे वस्त्रोद्योग महामंडळाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी लवकरच आपआपल्या पदाचा कार्यभार स्विकारतील, अशी माहिती आहे.

Related Articles

Back to top button