अमरावती/दि.२१-राष्ट्रसंत गाडगे बाबा म्हणायचे की माणसाने माणसा मधल्या देवाला ओळखून त्याची तन-मन-धनाने सेवा केली पाहिजे. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, गरिबांना वस्त्र, अशिक्षितांना शिक्षण, बेरोजगारांना काम, नीराशान्ना धाडस आणि मुक्या जीवांना अभय प्रधान करणे हीच ईश्वराची खरी भक्ती होय. गाडगे बाबा जिथेही जायचे तिथे सर्वात अगोदर गेल्यावर तो संपूर्ण परिसर झाडूने स्वच्छ करायचे याच अनुषंगाने अमरावती महानगरपालिकेच्या सर्व मनपा शाळांमध्ये शिक्षण सभापती आशिषकुमार गावंडे यांच्या सूचनेनुसार संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाळा स्वच्छता पंधरवडा म्हणून दिनांक 20 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यामध्ये शाळेमध्येच शाळे द्वारे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. ज्याची सुरुवात काल संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनी झाली. गाडगे महाराजांना आदरांजली म्हणून मनपाच्या सर्व शाळांमध्ये शाळा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ज्यामध्ये सर्व मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. व या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन संपूर्ण शाळा परिसर स्वच्छ करून टाकला. हे करत असताना विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले व सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे शाळा एकात्मतेचे दृश्य शाळेमध्ये निर्माण झाले. हे सर्व पाहून शिक्षण सभापती आशिषकुमार गावंडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापकांची व शिक्षकांचे कौतुक केले व शाळा स्वच्छता अभियान पंधरवडा अशाच प्रकारे चांगल्या रीतीने पार पाडला जाईल अशी आशा व्यक्त केली. गाडगे बाबा यांना जर खरोखर आदरांजली द्यायची असेल तर त्यांनी शिकवलेली शिकवण आपल्याला आत्मसात करावी लागेल तेव्हाच खऱ्या अर्थाने गाडगेबाबांना आदरांजली अर्पण करण्यात आली असे समजले जाईल असे आशिष गावंडे बोलतांनी बोलले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मनपा शिक्षण विभाग तसेच शाळेचे सर्व मुख्याध्यापकांनी चांगले नियोजन करून परिश्रम घेतले. मनपा शाळा क्रमांक 4 बडनेरा, मनपा हिंदी कन्या माध्यमिक शाळा नागपुरी गेट, मनपा शाळा क्रमांक 18 प्रवीण नगर, मनपा शाळा क्रमांक 14 वडाळी, मनपा शाळा क्रमांक 8 रामनगर, मनपा शाळा क्रमांक 13 चपराशीपुरा, मनपा शाळा क्रमांक 6, मनपा प्राथमिक शाळा क्रमांक 20 नवाथे नगर, मनपा हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक 4 अंबापेठ, मनपा शाळा आकोली, मनपा शाळा क्रमांक 8 बजरंग प्लॉट, मनपा शाळा क्रमांक 24 बडनेरा व मनपा शाळा शेगाव या शाळांनी शाळा स्वच्छता अभियानामध्ये विशेष सहभाग दर्शविला.