अमरावती

आरोग्य सेविकेच्या कामांचे मूल्यमापन करून पगारात वाढ करावी

  • आरोग्यसेविका कृती समितीचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना उप आयुक्त यांचेमार्फत निवेदन सादर.

अमरावती दि ९ – कोरोना संक्रमण काळात आरोग्य सेविका यांच्या कामांमध्ये दैनंदिन वाढ होत चाललेली आहे कोविड १९ चें लसीकरण , नवीन रुग्ण निघाले की त्यांच्या घरी भेटी ,हाय रिस्क, लो-रीक्स काढणे, त्यांच्या तपासणी करून घेणे त्यांचे लसीकरण करणे त्यांना फॉलोअप देणे पेशंटला वरचेवर भेटी देणे इत्यादी कामे आरोग्यसेविका हया पार पाडत आहेतच परंतु त्याच सोबत आता एंटीजनटेस्ट आरोग्यसेविका करणार अशा प्रकारचा आदेश काढल्यामुळे आरोग्य सेविका यांना टेस्टिंग करावी लागणार त्याच बरोबर इतर राष्ट्रीय कार्यक्रम माता बाल संगोपन, RCH,एनसीडी नियमित लसीकरण ,रिपोर्टिंग ,PMMVY,JSY,राष्ट्रीय कार्यक्रम, फॅमिली प्लानिंग,इतरही कामांचा भार आरोग्यसेविकांनवर आहेचं त्यामुळे सगळ्या गोष्टी घेऊन चालताना आरोग्य सेविकेंची मानसिक तारांबळ होत आहे त्यामुळे इतर कामे सुद्धा मागे पडण्याची शक्यता आहे तेव्हा एंटीजंट टेस्ट करण्यासाठी आरोग्यसेविका यांच्यावर विशेष जबाबदारी देऊ नये व कामाची योग्य प्रकारे विभागणी करून द्यावी जेणेकरून कामही सुरळीत होईल व आरोग्य सेविका यांच्या वरचा ताण थोडा कमी होईल अशी मागणी सादर केलेल्या निवेदनातुन केली आहे.सातवा व्या वेतन आयोगा चा परिपूर्ण लाभ मिळावा, महागाई भत्ता मिळावा, प्राथमिक आरोग्य केंद्रात ०२ एच व्ही पदे भरावी, कोरोना काळात जोखिम प्रोत्साहनपर भत्ता मिळावा आदी मागण्यांचे निवेदन आरोग्यसेविका कृर्ती समिती च्या वतीने विभागीय आयुक्त स्थित मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा उप आयुक्त संजय पवार यांना देण्यात आले यावेळी पुष्पा वानखडे, चंदा बेलसरे, अर्चना धुर्वे, पद्मा राठोड, ललिता मेश्राम, दीपाली शिंदे, स्वाती अळसपूरे,इत्यादी आरोग्य सेविका उपस्थित होत्या.
आरोग्य सेविकेच्या मागण्या शासनाच्या कडून मान्य करण्यासाठी सदरचे निवेदन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठवून त्यांच्या प्रति सार्वजनिक आरोग्य मंत्री, ग्रामविकास मंत्री, मुख्य सचिव ,तसेच संचालक अर्चना पाटिल आरोग्य सेवा पुणे यांनाही पाठवनार असल्याचे मुख्यमंत्री सचिवालयाचे संजय पवार यांनी यावेळी सांगितले. ……..

Related Articles

Back to top button