अमरावतीमराठी

शेतकरी व मजुर बांधवाच्या हितासाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसीत करावे- राज्यमंत्री बच्चू कडू

अमरावती/दि22– शेतकरी व मजुर बांधवाच्या हितासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन कामगार व शालेय शिक्षण मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले. अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतनला ( दि.18) त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. विजय मानकर, सहसंचालक एम. पी. वाडेकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, सहा. संचालक (तांत्रिक) एम.एम. अंधारे, पी. एम. भुयार, विभाग प्रमुख व अधिव्याख्याता उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री. कडू म्हणाले, शिक्षित व तंत्रकुशल वर्गाने आपल्या ज्ञानाचा वापर तळागाळातील समाजासाठी करावा. शेतकरी, मजुर बांधवाच्या हिताचे संशोधन व उपक्रम वेळोवेळी राबवावे. संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री. कडू यांनी यावेळी केले.
यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील शैक्षणिक बाबींचा आढावा घेतला असता श्री. कडू यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या वेळापत्रक व परीक्षा पद्धतीची माहीती घेतली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका त्यांना वेळेत उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधितांना सुचना केल्या. गरजु विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधांचा लाभ द्यावा. विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक बाबींमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधितांना सुचना केल्या.
सुत्रसंचालन स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे डॉ. नरेद्र सिनकर यांनी केले. आभार उपयोजित यंत्रशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रशांत उत्तरवार यांनी मानले. विविध विषयाचे अधिव्याख्याता व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button