नांदगाव पेठ/दी. १७- संगमेश्वर परिसरात दुसरा बिबट दिसल्याने गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दिवसभर वनविभागाने शोधमोहीम राबविली मात्र बिबट गवसला नसल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली. संपूर्ण परिसर विभागाने पिंजून काढला परंतु आजूबाजूला कोणत्याही क्षेत्रात त्याचे ठसे आढळले नसल्याने वनविभागाचे कर्मचारी आल्यापावली परतले.बुधवारी एका बिबटने चार जणांवर हल्ला चढवून त्यांना जखमी केल्याने वनविभागाने तातडीने बिबटला जेरबंद केले.परंतु दुसऱ्या दिवशी तो बिबट जयस्वाल यांना त्याच ठिकाणी आढळला व त्यानंतर काहींनी संगमेश्वर येथील विहिरीजवळ दिसल्याने सांगितले त्यामुळे वडाळी वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक कैलाश भूंबर यांच्या टीमने रात्रीची गस्त घालून शोधमोहीम राबविली मात्र रात्रीच्या वेळी काहीच हाती न लागल्याने रेस्क्यू टीम बिबटविनाच परतली.शुक्रवारी सकाळपासून शोधमोहिमेला प्रारंभ केला पर्यंतू बिबटचे ठसे देखील न आढळल्याने रेस्क्यू टीम समोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. नेमका दुसरा बिबट आहे का? आहे तर तो नेमका कोणत्या दिशेने गेला ? गेला तर पायाचे ठसे देखील नाहीत? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत मात्र नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन वनविभाग व पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे ठाणेदार प्रवीण काळे यांनी देखील त्या परिसरात पेट्रोलिंग करून शेतात असणाऱ्या शेतकऱ्यांना सावध केले.बिबट तूर्तास जरी वनविभागाच्या हाती लागला नसला तरी शोधमोहीम सुरूच असणार आहे.मात्र यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट मात्र कायम आहे.
सावधानता बाळगावी
काल रात्री आणि आज दिवसभर माहितीच्या आधारे बिबट पकडण्यासाठी शोधमोहीम राबविली.रेस्क्यू टीम ने परिसरात सर्वच ठिकाणी पायाचे ठसे व ईतर बाबी तपासल्या मात्र परिसरात कुठेही बिबट गवसला नाही मात्र अजूनही शोधमोहीम सुरूच आहे. गावकर्यांनी सावधानता बाळगावी.