अमरावती

हनवतखेडा येथे १५० नागरिकांचे लसीकरण

अमरावती/दि.३०– अचलपूर तालुक्यातील  ग्रामपंचायत हनवतखेडा येथील आरोग्य उपकेंद्र ४५ वर्षे  वयोगटावरील नागरिकांना कोविशिल्ड लसिच्या पहिल्या डोज चे लसिकरण नुकतेच पार पडले. यावेळी १५० नागरिकांना लस देण्यात आली.
लसिकरणा करीता वैद्यकीय अधिकारी त्यांच्या चमूने विशेष सहकार्य केले.
लसीकरणाच्या वेळी सरपंच विजय ढेपे, उपसरपंच सौ.संगिता सरदार तसेच सदस्य कैलास घोम, धनराज घोम, प्रमोद दाभाडे,सौ.रेखा सरदार, सौ.अलका सरदार,कु.श्रद्धा खवले , सौ.ज्योती बांनाईत, रविंद्र खवले, मनोज ताठे, अमोल बोरेकर, मोहोड  यांनी परिश्रम घेतले.यावेळी .जिल्हा परिषद सदस्य,प्रताप अभ्यंकर  अमोल  बोरेकर यांनी लसिकरण केंद्राला सदिच्छा भेट दिली.
लसिकरणा ची व्यवस्था करुन दिल्याबद्दल गावकऱ्यांनी सरपंच, उपसरपंच , सदस्य यांचे आभार मानले.अथक प्रयत्नानंतर  गावामध्ये  लस उपलब्ध झाली त्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डाॅ.मोहोकार मॅडम यांचे अरविंद घोम यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button