मराठीलेख

विद्यार्थीप्रिय सरसेनाध्यक्ष बिपिन रावत

जनरल बिपिन रावत हे देशाचे पहिले सरसेनाध्यक्ष होते.  भारतीय लष्कराचा त्याच्या आक्रमक व्यहरचनेमुळे शेजारी देशात दबदबा होता. पाकिस्तान आणि चीनला सडेतोड उत्तर देतानांच त्यांनी भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण विशेष पद्धतीने केले.  भारतीय लष्कर सक्षम करण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. देशाचा नवयुवक विशेषत: विद्यार्थी हा बलशाली, मानसिकरित्या मजबुत, कठीण प्रसंगाचा सामना करणारा आणि सदैव हौसला बुलंद ठेवणारा असावा या मताचे ते होते.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे हे यापूर्वी ए.आय.सी.टी.ई., नवी दिल्ली मध्ये वरिष्ठ सल्लागार वर्ग – 1 या पदावर कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी जनरल बिपिन रावत सरांची भेट घेवून उच्च शिक्षणावर चर्चा केली.  भारतीय शिक्षण कसे असावे, विद्याथ्र्यांचा सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकास कसा होईल?,  भारत मातेविषयी त्याच्या मनात सदैव गौरव कसा राहील आणि त्यादृष्टीने देशाच्या विकासामध्ये त्याचे योगदान यासह अनेक गोष्टींवर भेटी दरम्यान चर्चा झाली. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी रावत सरांना देशभरातील विद्याथ्र्र्यांना मार्गदर्शन देण्यासाठी येण्याची विनंती केली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, मला विद्याथ्र्यांना व्याख्यांनातून विचार देण्यामध्ये आनंदच होईल. डॉ. मालखेडेजी आपण व्याख्यानाचं निश्चित आयोजन करा, मला विद्याथ्र्यांना भाषण देण्यामध्ये खूप आनंद होईल.
कुलगुरू डॉ. मालखेडे यांच्या विनंतीला मान देवून जनरल बिपिन रावत यांनी देशभरातील विद्याथ्र्यांसाठी ऑनलाईन व्याख्यान दिले.  त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक महत्वपूर्ण मुद्यांवर भर दिला.  अनेक महापुरूषांचे दाखले दिले. विद्याथ्र्यांचा दृष्टीकोन कसा असावा, विवेकशीलता, देशाप्रती प्रेम, कौशल्य आत्मसात करण्याची सदैव जिद्द, कार्याची प्रभावीपणे अंमलबजावणी, शिस्त यांशिवाय त्यांच्यामध्ये मौलिक गुण असायला हवेत.   विद्यार्थी हा प्रामाणिक असला पाहिजे, तो सदैव उत्साही, त्यांच्यामध्ये कार्याप्रती निष्ठा असायला हवी. वरिष्ठांबद्दल आदरभाव, सकारात्मक विचार त्याने सदैव बाळगावा. सहकार्य, समन्वय, कृतज्ञता, दया, देशाप्रती निष्ठा, सामाजिक जाण हे गुण सुद्धा त्यांच्यामध्ये असायला हवेत. विद्याथ्र्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सातत्यपूर्ण करायला हवेत. त्यांच्या प्रयत्नांमध्ये सात्यतता असायला हवी, यांसह त्यांनी शैक्षणिक व संरक्षण विषयक विषयांवर विद्याथ्र्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले होते.
डॉ. मालखेडे सरांच्या प्रयत्नामुळे देशभरातील विद्याथ्र्यांसाठी एका अर्थाने ती ज्ञानाची व अनुभवाची मेजवानीच होती. भारतीय विद्याथ्र्याच्या भावी आयुष्यसाठी महत्वपूर्ण असं ते व्याख्यान होते.  सैन्यामधील सैनिकांना व अधिका­यांना त्यांनी दिलेली भाषणं प्रेरणादायी राहीली आहेत. आज बिपिन सर आपल्यात नाही, ही भारतीयांसाठी खूप वेदनादायी घटना आहे.  त्यांचे अनुभव, आक्रमकता, व्यूहरचना, शत्रूला सडेतोड उत्तर देणारा असं व्यक्तीमत्व आज आपल्यात नाही, त्यामुळे भारताची फार मोठी हानी झाली आहे.
जनरल बिपिन हे लष्कर प्रमुख असतांना त्यांची देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (डी.सी.एस.) या पदावर नियुक्ती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली लष्काराचे आधुनिकीकरणे, तिन्हीही दलांच्या एकत्रित काराभारासाठी थिएटर कमांडची निर्मिती प्रक्रिया त्यांनी सुरू केली. आपला शस्त्रू चिनला प्रत्युत्तर देण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
विद्याथ्र्यांनी जनरल बिपिन रावत यांच्या विचार व कार्यापासून प्रेरणा घ्यावी, हीच खरी श्रध्दांजली ठरेल असे मत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी व्यक्त केलं. विद्यार्थीप्रिय जनरल बिपिन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ. विलास नांदुरकर
(लेखक हे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आहेत)

Related Articles

Back to top button