लेख

पद्मभुषण डॉ. विजय भटकर यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने उन्नत भारत अभियान

सध्या ग्रामीण भागात, ग्रामीण जनता, आपले दैनंदिन जीवन अतिशय कठीण अशा परिस्थितीत विविध समस्यांना, आत्मविश्वासाने सामोरे जात, गावातच आपले मौल्यवान जीवन जगत आहेत. आपल्या स्वकल्याणाच्या विकासाच्या वाटा शोधण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपलेच गावातील उच्च शिक्षण घेतलेली बुद्धीजीवी मंडळी शहरात आली. शिक्षक, प्राध्यापक, इंजिनिअर, डॉक्टर, वकील इत्यादी झालीत आणि शहराच्या भौतिक वातावरणात समरस झााल्यामुळे त्यांना आपल्या गावात बालपणी मिळालेले संस्कार, गावाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा विसर पडला आहे.
माहे २१ मार्च २०२० ते कोरोना आटोक्यात येईपर्यंत लॉकडाऊन स्थितीमुळे साहजीकच घरात राहून प्रत्येकाला आत्मचिंतन करण्यापलिकडे मार्ग उपलब्ध नव्हता. अनेकांनी कोरोना परिस्थिती आटोक्यात येताच आपले उर्वरीत मौल्यवान जीवन अतिशय आनंदी, प्रसन्न, उत्साही, निरोगी, जिद्द, चिकाटी इत्यादी दिव्य गुणाचा आदर्श घेत, आत्मनिर्भरतेने जगण्यासाठी गावाची नाळ जोडण्याचा संकल्प केला आहे. जैविक शेतीच्या माध्यमातून निर्माण होणारे विषमुक्त अन्न सेवन करणे आणि त्याचा प्रचार, प्रसार करणे ही जबाबदारीही स्विकारली आहे. आपल्या देशात उपलब्ध असलेले आधुनिक तंत्रज्ञानाचे मनुष्यबळ, विशेषत: इंजिनिअर यांचा योग्य वापर आपल्या गावात योग्य पद्धतीने कसा केल्या जाईल, या विषयावर पद्मभुषण डॉ. विजय भटकर सातत्याने विचार करीत होते. त्यांच्या या चिंतनीय कल्पनेतून पुढे आलेली संकल्पना म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा ग्रामीण भारत पुनश्च सक्षम करणे गरजेचे आहे. यासाठी अद्यावत तंत्रज्ञान ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पद्मभुषण डॉ. विजय भटकर यांची ग्रामीण विकासाच्या माध्यमातून उन्नत भारत निर्माण करण्याची संकल्पना आवडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मभुषण डॉ. विजय भटकर यांना उन्नत भारत अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केले. सन २०४७ पर्यंत उन्नत भारत अभियान वाटचाल सुरु झाली.
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत क्रषीमंत्री गोविंदराव आदीक यांनी दिनांक २७ डिसेंबर २००३, पापळ डॉ. पंजाबराव देशमुखांचे जन्मस्थळ, जि. अमरावती येथून कृषीसप्तक कार्यक्रमाला तत्कालिन पालकमंत्री श्रीमती वसुधाताई देशमुख यांच्या नेतृत्वात प्रारंभ केला. दिनांक ३० जानेवारी २००४ ला नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप केला. या कालावधीत डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेले कृषी सैनिक, कृषी मित्र, कृषी संघटक ही संकल्पना १०० कोटी रुपये खर्च करुन यशस्वी करुन दाखविली. याच कालावधीत कल्याण येथे छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठाची स्थापना करण्यात आली असून, त्याचे उद्घाटन डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांनी केले. याप्रसंगी लोक विद्यापीठाचे कुलगुरु, आंतरराष्ट्रीय किर्तीचे जेष्ठ कृषी तज्ञ डॉ. रमेशभाऊ ठाकरे, महाराष्ट्र राज्य कृषक समाजाचे चेअरमन अॅड. नारायण ओले पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, कृषी शास्त्रज्ञ डॉ. वाय.एम. टाले, लोक विद्यापीठाच्या सचिव सौ. प्रतिमा मंगेश देशमुख, सहसचिव कल्याणी देशमुख, संस्थापक अध्यक्ष डॉ. मंगेश देशमुख, सेंद्रीय शेती तज्ञ डॉ. राजेंद्र गावंडे, श्री. सिताराम फलोत्पादन व बांबुविकास लोक विद्यापीठ तिनखडी, ता. पाथर्डी, अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष नलंगे, पुण्यश£ोक अहिल्यादेवी होळकर लोक विद्यापीठ, कासारे, ता. पारनेर, जि. अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष प्रा. धोंडीभाऊ दातीर, राजश्री शाहु महाराज लोक विद्यापीठ चंदगड जि. कोल्हापूरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश पाटील, महाराजा सयाजीराव गायकवाड लोक विद्यापीठ, पाळेपिंपरी, ता. कळवण जि. नाशिकचे संस्थापक अध्यक्ष संजय गायकवाड, फुकुओका नैसर्गिक शेती तंत्रज्ञान लोक विद्यापीठ बेल्ला ता. जुन्नर जि. पुणेचे संस्थापक अध्यक्ष गणपत औटी, राजे लखुजी राव जाधव, लोक विद्यापीठ सिंदखेड राजाचे संस्थापक अध्यक्ष, राजे शिवाजीराव जाधव, राजमाता जिजाऊ लोक विद्यापीठ देऊळगाव राजाचे संस्थापक अध्यक्ष अनंत देशमुख, गोमती गोसेवा लोक विद्यापीठ, पिंपळडोळी जि. अकोलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय देशमुख नवोदय मत्स्य व पशु विकास लोक विद्यापीठ सांगवी जि. अकोलाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर डाहाके इत्यादी मंडळी उपस्थित होते.
अमरावती येथील नांदगाव पेठ परिसरात टेक्सटाईल पार्कला लागून छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ, कल्याणयांच्याकडे उपलबध असलेल्या ५० एकर जमिनीवर उन्नत भरत अभियान यशस्वीतेसाठी विविध मॉडल्स विकसित करण्याचे नियोजन आहे. यामध्ये वॉटर प्रोजेक्ट, जैविक शेती प्रकल्प, कोरोना सारख्या गंभीर आजाराला प्रतिबंध करण्यासाठी विविध वनौषधी लागवड प्रकल्प, रानभाज्या विकास प्रकल्प, देशी गायीपासून जीवामृत, घनजीवामृत, किडनियंत्रक व मानवी आरोग्यासाठी गोअर्क निर्मिती प्रकल्प, आत्मविश्वास मंदिर निर्मितीचेही नियोजन आहे. या प्रकल्पामध्ये स्वेच्छेने सहभागी होवू इच्छिणा:यांनी संधी देण्याची व्यवस्था आहे. संपर्क प्रा. प्रविण गुल्हाने मो.नं. ९८६०५६८४६४ ही सर्व लोक विद्यापीठे, पद्मभुषण डॉ. विजय भटकर यांचे उन्नत भारत अभियान कार्यक्रम गावागावात आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी अहोरात्र आत्मविश्वासाने लोकाभिमुख करीत आहेत.

Related Articles

Back to top button