मुंबई बाजार समितीच्या सभापतिपदी डक
सभापतिपदी अशोक डक यांची निवड

नवी मुंबई/दि. ३१ – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अशोक डक तर उपसभापतिपदी धनंजय वाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. डक हे बारामतीचे जावई आहेत. ते मराठवाडा महसूल विभागातून तर वाडकर पुणे महसूल विभागातून बाजार समितीवर निवडून गेले आहेत.





