मनोरंजन

सुशांतच्या बहिणीविरोधात रियाची पोलिसांत तक्रार

मुंबईः रिया चक्रवर्तीने सुशांतची बहीण प्रियांकाविरोधात बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन बनवल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रियाच्या वकिलांनी सांगितल्यानुसार, आठ जून रोजी प्रियांकाने सुशांतला बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन पाठवले होते. त्यामध्ये एनडीपीएस कायद्याने बंदी घातलेल्या औषधांचा उल्लेख होता.
दुसरीकडे, एम्सची फॉरेन्सिक टीम सुशांत प्रकरणात विषप्रयोग करण्यात आला होता, याचा तपास करण्यासाठी व्हिसेरा चाचणी करणार आहे. दहा दिवसांत याचा अहवाल येईल. सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांतला विष देण्यात आले होते, असा संशय मेडिकल टीमला आहे. याप्रकरणी मेडिकल बोर्डची पुढची मिटींग येत्या १७ सप्टेंबर रोजी होईल. सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करणार्याा नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची (एनसीबी) टीम आज सलग दुसर्यात दिवशीही रिया चक्रवर्तीची चौकशी करीत आहे. रियाचा भाऊ शोविक, सुशांतचे हाऊस मॅनेजर मिरांडा आणि हेल्पर दीपेश सावंत यांना समोर बसवून तिला प्रश्नोत्तरे केली जाऊ शकतात.

Back to top button