माजी उपसरपंच मो. साबीर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नांदगांव पेठ/प्रतिनिधी २२:- येथील ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच मो. साबीर मो. नासिर यांचे आज शनिवारी दुपारच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. राजकारणात अलौकिक छाप असणारे तसेच सहकार क्षेत्रात व मुस्लिम समुदायामध्ये प्रभाव असणारे व्यक्तिमत्व हरवल्याची शोकसंवेदना अनेकांनी व्यक्त केल्यात.
   तब्बल तीन वेळा ग्रामपंचायत चे उपसरपंच म्हणून त्यांनी पदभार सांभाळला.नुकत्याच विसर्जित झालेल्या ग्रामपंचयतचे ते उपसरपंच होते. मागील काही वर्षांपासून त्यांना विविध आजाराने ग्रासले होते. त्यामुळे ते घरीच राहत होते. शनिवारी सकाळ पासून त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते मात्र दुपारी अचानक श्वसनाचा त्रास वाढल्याने त्यांची प्रकृती खालावली आणि अचानक हृदयविकाराचा झटका येऊन त्यांची प्राणज्योत मालवली.
    त्यांच्या निधनाची बातमी कळताच शासकीय वसाहत मधील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी एकच गर्दी केली. ग्रामपंचायत च्या सर्व माजी पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. सायंकाळी सय्यदपुरा येथील कब्रस्तान मध्ये त्यांचेवर अंत्यविधी करण्यात आले.
Back to top button