आयडिया-व्होडोफोनचे दर वाढण्याची शक्यता

ही कंपनी आता व्हीआय म्हणून ओळखली जाणार

मुंबई दी ७ – टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आणि आयडियाने त्यांच्या नावांचे रिब्रॅडिंग केले आहे. ही कंपनी आता व्हीआय म्हणून ओळखली जाणार आहे. या कंपनीचे मालकी हक्क ब्रिटनमधील व्होडाफोन आणि आदित्य बिर्ला समूहाकडे आहे.  या दोन्ही कंपन्यांनी आज त्यांच्या नवीन ब्रँडिंगची घोषणा केली. या वेळी विलीनीकरण हे या दोन ब्रँडचे आतापर्यंतचे जगातील सर्वात मोठे टेलिकॉम इंट्रीगेशन आहे. इतकेच नाही, तर आता कंपनीने दर वाढणार असल्याचेही संकेत दिले आहेत.

Back to top button