बर्लिन/ इस्लामाबाद : जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल (German Chancellor Angela Merkel) यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक समितीने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानने आपल्या पाणबुडींसाठी एअर इंडिपेंडट प्रोपल्शन (एआयपी) मागितले होते. त्यास जर्मनीने नकार दिला आहे. एआयपीच्या मदतीमुळे पाणबुडी अनेक आठवडे पाण्याखाली राहू शकतात. ‘जर्मन फेडरल सिक्युरिटी कौन्सिल‘ने पाकिस्तानला आपला निर्णय सहा ऑगस्ट रोजी सांगितला होता. पाकिस्तानने एआयपीची मागणी केली होती. जेणकरून त्यांच्या ताफ्यातील पाणबुडी पाण्यातून वर येऊ नये. एआयपी प्रणालीमुळे पाणबुडींची युद्धात लढण्याची क्षमता अधिक होते. या प्रणालीमुळे डिझेल इंजिनशिवाय अटमॉस्फीरिक हवा अनेक आठवडे सुरू राहू शकते. पारंपरिक पाणबुडींना दर दुसèया दिवशी समुद्राच्या पृ्ष्ठभागावर यावे लागते. त्यामुळे या पाणबुडी इतर देशांच्या नौदलाच्या रडारवर दिसू शकतात. जर्मनीने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली असल्याचे हे संकेत समजले जात आहेत. पाकिस्तानने दहशतवादाला नियंत्रित आणले नाही. त्यामुळे जर्मनी पाकिस्तानवर नाराज असल्याचे वृत्त आहे. अफगाणिस्तानमधील काबूल येथील जर्मनीच्या दूतावासाजवळ २०१७ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यातील आरोपींना शिक्षा देण्यास पाकिस्तान असमर्थ ठरला. यामध्ये जवळपास १५० जणांचा बळी गेला होता. या स्फोटामागे हक्कानी नेटवर्कचा हात होता. हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानचा पाqठबा असल्याची चर्चा आहे. पाकिस्तान आपली नौदलाची क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तान चीनकडून युद्धनौका आणि पाणबुडी घेणार आहे. चीनने नुकतीच एक युद्धनौका पाकिस्तानसाठी तयार केली आहे.