पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ही लढ़ाई आपण जींकू
१० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरंन्सिंग माध्यमाने घेतली बैठक
नवी दिल्ली/दि.११– मंगळवारी कोरोना व्हायरस महामारी संदर्भात 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली. पंतप्रधान म्हणाले कि कोरोनावर राज्यांसोबत काम सुरू असून, ही लढाई योग्य प्रकारे चालली आहे. या बैठकीत आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगाणा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते. ही सर्व रज्ये दाटीवाटीच्या लोकसंख्या असलेली आहेत. तसेच येथे कोरोनाबाधिक रुग्णांची संख्याही अधिक आहे. यामुळे ही बैठक महत्वाची आहे.
सक्रिय रुग्णांचा टक्का कमी झाला आहे. रिकव्हरी रेट वाढत आहे. याचाच अर्थ आपले प्रयत्न यशस्वी सिद्ध होत आहेत. ज्या राज्यांत तपासणी दर कमी आहे आणि जेथे पॉझिटिव्ह रेट अधिक आहे. तेथे टेस्टिंग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे. विशेषत: बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तेलंगाना या राज्यांत टेस्टिंग वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. तसेच आज टेस्टिंग नेटवर्क शिवाय आरोग्य सेतू अ?ॅपही आपल्याकडे आहे. या अ?ॅपच्या माध्यमानेही आपण हे काम सहजपणे करता येऊ शकते. यासंदर्भात या समीक्षा बैठकीत चर्चा झाली.
आज या प्रयत्नांचे परीणाम आपण पाहत आहोत. रुग्णालयांतील उत्तम व्यवस्थापन, तसेच आयसीयू बेड्सची संख्या वाढवण्यासारख्या प्रयत्नांचीही मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली आहे. आपल्या राज्यांत प्रत्यक्ष स्थितीवर लक्षदिल्याने जे परिणाम समोर आले आहेत. त्यातूनच यशाचा मार्ग तयार होत आहे. मला आशा आहे, की आपल्या या अनुभवाच्या ताकदीने देश ही लढाई पूर्णपणे जिंकेल आणि एक नवी सुरुवात होईल, असे मोदी म्हणाले.
या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. कोरोनाने देशात डोके वर काढल्यापासून आजपर्यंत पंतप्रधान मोदींची राज्यांबरोबरची ही सातवी बैठक आहे. देशात एका दिवसात समोर येणाऱ्या करोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मंगळवारी हा आकडा 53,601 होता. देशात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने 60,000 हून अधिक रुग्ण समोर येत होते.
महाराष्ट्रात सध्या 10 लाख 1 हजार 268 लोक घरगुती अलगीकरणात आहेत, तर 35,521 लोक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. राज्यात सोमवारी दिवसभरात कोरोनाचे 9 हजार 181 रुग्ण आढळले, तर 293 जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5 लाख 24 हजार 513 झाली असून एकूण 18,050 जणांनी जीव गमावला. दिवसभरात 6 हजार 711 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 3 लाख 58 हजार 421 रुग्ण कोविडमुक्त झाले.
मुंबईत दिवसभरात 925 बाधित तर 46 मृत्यूंची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या 1 लाख 24 हजार 307 असून बळींचा आकडा 6,845 आहे. आतापर्यंत 97,993 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 78 टक्के झाला असून रुग्ण दुपटीचा दर 87 दिवसांवर गेला आहे. दरम्यान, मुंबईत सेरो सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आह