देश दुनिया

मोदींनी अयोध्येत झाड काय लावले; झाड लावण्यासाठी एक झुंबड उडाली

कमालच झाली, स्टॉक संपला!

हिं.स./दि.8

नवी दिल्ली – अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमाची दखल संपूर्ण जगाने घेतली. पण मोदींनी राम मंदिराच्या भूमिपूजना दरम्यान केलेल्या कृतीमुळे झाडाची विक्री करणाऱ्यांची दिवाळी झाली आहे. जाणून घेऊयात काय आहे प्रकरण…
राम मंदिर परिसरात भूमिपूजन करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारिजातकाचे झाड लावले. पारिजातकाचे झाड तसे पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीशी जोडले गेले आहे. पण शहरातील लोकांनी अचानक या झाडाबद्दल नव्याने शोध सुरू केला आणि जेव्हा त्यांना पारिजातकाचे महत्त्व कळाले तेव्हा हे झाड लावण्यासाठी एक झुंबड उडाली.
पारिजातकाचे झाड वास्तूच्या दृष्टीने शुभ मानले जाते. या झाडेची पाने, फूल, मूळ आदींचे औषधी गुण आहेत. त्यामुळे शहरातील लोकांनी नर्सरीमधून या झाडाची खरेदी सुरू केली. याचा परिणाम असा झाला की पारिजातकाचा स्टॉक नर्सरीमधून संपला.
राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी २० ते २५ रुपयांना मिळणारे पारिजातकाच्या झाडाची किमत २५० रुयपांवर गेली. अनेक नर्सरीमधील पारिजातकाच्या झाडाचा स्टॉक संपला आहे. आता पारिजातकाचे झाड पुढील वर्षीच मिळेल. या झाडाच्या बिया देखील मिळण्याची शक्यता नाही.पारिजातकाला आश्विन-कार्तिकमध्ये फुल येतात. त्यानंतरच नवे झाड तयार होईल असे एका नर्सरी मालकाने सांगितले.असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी जी काही रत्न मिळाली होती त्यात पारिजातकाचा समावेश होता. तेव्हा पारिजातकाचे झाड इंद्र देवाने स्वत:कडे ठेवले होते. नंतर श्रीकृष्णाने हे झाड स्वर्गातून पृथ्वीवर आणले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button