मुंबई/दि.२४- आज राज्यात तब्बल 14 हजार 219 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे(Successful defeat of Corona). एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याने थोडा दिलासा मिळत आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. (आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-743 (20), ठाणे- 115 (5), ठाणे मनपा-132 (6), नवी मुंबई मनपा-329 (1), कल्याण डोंबिवली मनपा-192 (1), उल्हासनगर मनपा-15 (16), भिवंडी निजामपूर मनपा-16, मीरा भाईंदर मनपा-74 (4), पालघर-46, वसई-विरार मनपा-120 (2), रायगड-138 (5), पनवेल मनपा-138, नाशिक-175 (2), नाशिक मनपा-699 (4), मालेगाव मनपा-40 (1), अहमदनगर-270 (7),अहमदनगर मनपा-128 (2), धुळे-222 (4), धुळे मनपा-114 (2), जळगाव-539 (15), जळगाव मनपा-110 (3), नंदूरबार-118, पुणे- 382 (4), पुणे मनपा-1107 (16), पिंपरी चिंचवड मनपा-815 (4), सोलापूर-310 (9), सोलापूर मनपा-57 (1), सातारा-446 (10), कोल्हापूर-426 (7), कोल्हापूर मनपा-243, सांगली-152 (4), सांगली मिरज कुपवाड मनपा-272 (3), सिंधुदूर्ग-61, रत्नागिरी-96 (2), औरंगाबाद-163 (4),औरंगाबाद मनपा-178 (2), जालना-33 (1), हिंगोली-5, परभणी-20 (1), परभणी मनपा-30, लातूर-56 (4), लातूर मनपा-28 (3), उस्मानाबाद-202 (1),बीड-138 (7), नांदेड-94 (2), नांदेड मनपा-73 (2), अकोला-39, अकोला मनपा-8, अमरावती-44, अमरावती मनपा-94, यवतमाळ-62, बुलढाणा-62, वाशिम-53 (1), नागपूर-178 (3), नागपूर मनपा-478 (15), वर्धा-5, भंडारा-16 (1), गोंदिया-40 (2), चंद्रपूर-16, चंद्रपूर मनपा-31 (1), गडचिरोली-5, इतर राज्य 24 (2).
तसेच आज राज्यात 11 हजार 015 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आत्तापर्यंत राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या 6 लाख 93 हजार 398 इतकी झाली आहे. तर, राज्यात सध्या 1 लाख 68 हजार 126 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 36 लाख 63 हजार 488 चाचण्यांपैकी 6 लाख 93 हजार 398 चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज 212 करोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील एकूण करोना मृतांची संख्या 22 हजार 465 इतका झाला आहे. सध्या राज्यात 12 लाख 44 हजार 024 व्यक्ती होम क्वारंटाइनममध्ये आहेत. तर, 33 हजार 922 संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.