चंद्रपूर,दी १९ : देशात महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत चालली आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. कौटुंबिक सहकाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनीही चाचणी करून घेतली होती. आता सुधीर मुनगंटीवार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संसर्गाचे प्रमाण शोधण्यासाठी करून मुनगंटीवार यांनी अन्य चाचण्या देखील करून घेतल्या आहेत. मुनगंटीवार घरीच उपचार घेणार आहेत. तसेच त्या कुटुंबातील इतर सदस्यांची देखील केली कोरोना चाचणी केली जाणार आहे.