महाराष्ट्र

मुंबई महापालिका सभागृहात राडा

भाजप-शिवसेनेचे नगरसेवक भिडले

मुंबई दी/३- वरळी, बीडीडी चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या दाम्प्त्यावर नायर रुग्णालयात उपचारास दिरंगाई करण्यात आली. या दुर्घटनेत भाजलेल्या चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून शुक्रवारी सभागृहात शिवसेना आणि भाजप नगरसेवक भिडले. सभागृहात दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये राडा घातला.

शुक्रवारी पालिकेची महासभा भायखळा येथील राणीबागेतील शाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात घेण्यात आली. यावेळी सभागृहात नायर रुग्णालयातील हलगर्जीपणावरून पालिका सभागृहात शिवसेना आणि भाजप नगरसेवकांनी गोंधळ केल्याचे पाहायला मिळाले. नायर रुग्णालयामध्ये चार महिन्यांच्या बाळाच्या मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार गोंधळ घातला.

या घटनेवरुन आक्रमक झालेल्या भाजप नगरसेवकांनी आरोग्य समितीचा राजीनामा दिला होता. हा मुद्दा आज सभागृहात चर्चेला आला. भाजप नगरसवेकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावर बोलताना स्थायी समिती यशवंत जाधव यांनी भाजपचे लोक राजीनामा देतात, आम्ही शिवसेनेचे लोक मात्र लढतो, असे विधान केले. यावरुन भाजप नगरसेवक संतापले आणि त्यांनी यशवंत जाधव यांना घेरले. यानंतर शिवसेना नगरसेवकही आक्रमकही झाले आणि दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला

दरम्यान, वरळी येथील बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटातील चार जखमींना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नायर रुग्णालय आणि पालिका प्रशासनावर टीकास्त्र उठले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेने या प्रकरणात चौकशी सुरु केली आहे. मात्र प्राथमिक चौकशीनंतर दोन डॉक्टर आणि एक परिचारिकेला गुरुवारी निलंबित करण्यात आले आहे.

याचबरोबर, उपअधिष्ठांमार्फत सुरु असलेल्या चौकशीचा अहवाल पुढच्या आठवड्यापर्यंत प्रशासनाला सादर होणार आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर त्रयस्थ समितीमार्फतही चौकशी करण्यात येणार आहे. या समितीमध्ये पालिकेतील वरीष्ठ डॉक्टरांसह खासगी क्षेत्रातील डॉक्टरांचाही समावेश असणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली होती.

.“कंत्राटदारांचे मुनीम झालेल्यांना चिमुकल्याच्या मृत्यूच्या वेदना कशा कळणार?”
दुसरीकडे, भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी यासंदर्भातील ट्विट करत सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कंत्राटदारांचे मुनीम झालेल्यांना चिमुकल्याच्या मृत्यूच्या वेदना कशा कळणार? असा सवाल त्यांनी केला आहे. ते म्हणाले, ” नायर रुग्णालय प्रशासन, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेचे ही राजकारण करण्याचे पाप स्थायी समिती अध्यक्षांनी आज पालिका सभागृहात केले. कंत्राटदारांचे मुनीम झालेल्यांना चिमुकल्याच्या मृत्यूच्या वेदना कशा कळणार?”

Related Articles

Back to top button