महाराष्ट्र

दीड कोटी टन साखर शिल्लक राहणार

नगर/दि.१८ – एक ऑक्टोबरला देशात एक कोटी सहा लाख टन साखर शिल्लक आहे. या वर्षीच्या हंगामात तीन कोटी दहा लाख टन उत्पादन होईल असा अंदाज आहे. चालू साखर हंगामात देशभरातील 244 साखर कारखान्यांमध्ये उत्पादन सुरू आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.
देशाच्या साखर कारखान्यांमध्ये चालू हंगामात उसाचे गाळप वाढले आहे. साखर उत्पादन 14 लाख टनांनी जास्त आहे. मागील हंगामातील याच कालावधीपेक्षा ते तीनपट जास्त आहे. भारतीय साखर कारखाना संघटनेने ( इस्मा)ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चालू साखर हंगामात 2020-21 मध्ये 15 नोव्हेंबरपर्यंत देशभरातील 274 साखर कारखान्यांमध्ये साखर उत्पादन 14.10 लाख टन होते. गेल्या वर्षी याच काळात 127 साखर कारखान्यांनी 4.84 लाख टन साखर उत्पादन केले होते. उत्तर प्रदेशातील 76 साखर कारखान्यांनी 15 नोव्हेंबरपर्यंत 3.85 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. मागील वर्षी याच काळात राज्यातील 78 साखर कारखान्यांत 2.9 लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील 117 कारखान्यांत 5.65 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत कर्नाटकातील 49 कारखान्यांत तीन लाख 40 हजार टन साखर उत्पादन झाले. गेल्या वर्षी 34 कारखान्यांत 1.43 लाख टन साखर होते.
गुजरातमध्ये 14 साखर कारखाने कार्यरत आहेत आणि साखर उत्पादन 80 हजार टन आहे. गेल्या वर्षी गुजरातमध्ये या काळात फक्त कारखाने कार्यरत होते. साखर उत्पादन फक्त दोन हजार टन होते. इस्माच्या म्हणण्यानुसार उत्तराखंड, बिहार, हरयाणा, मध्य प्रदेश, तामीळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुमारे 18 साखर कारखाने कार्यरत असून साखर उत्पादन 40 हजार टन आहे. देशात दोन कोटी 55 लाख टन साखर लागते. त्यामुळे 60 ते 70 लाख टन साखर निर्यात करण्याची गरज आहे.

Related Articles

Back to top button