मराठी
पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता विविध संघाची घोषणा
अमरावती/दी-१० सत्र 2021-22 करीता संपन्न होत असलेल्या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ स्पर्धेकरिता विद्यापीठाचे विविध संघ घोषित झाले आहे.
डी.सी.पी.ई. अमरावती येथील कु. आदिती काळे, कु. माधुरी ससणकर, कु. कल्याणी दातिर व कु. विशाखा बनकर, शासकीय विदर्भ इन्स्टिट¬ुट ऑफ सायन्स, ह्रुमॅनिटीज, अमरावतीची कु. वैष्णवी यादव व कु. साक्षी अरोकार, भारतीय महाविद्यालय, अमरावतीची कु. श्रेया गणेशकर, ब्रिाजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची कु. अपुर्वा ठाकरे व कु. निकीता सखे, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीची कु. जान्हवी केसाळे, कु. मानसी खोब्राागडे, कु. समिक्षा चंदन, कु. गौरी वराडे व कु. धनश्री वावरे, प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉ. अॅन्ड रिसर्च, बडनेरा रेल्वेची कु. स्वरदा अडवाणीकर, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाची कु. समृद्धी डहाके.
फुटबॉल (महिला)जिजामाता महाविद्यालय, बुलढाणाची कु. अपुर्वा पालकर, फलसिंह नाईक महाविद्यालय, पुसदची कु. प्राजक्ता पेंढारकर, कु. ऋतुजा चव्हाण व कु. रेवती कोकरे, स्व. भास्करराव शिंगणे महाविद्यालय, साखरखेर्डाची कु. दिपसिका हवाले, कु. मितल काड व कु. निकीता काकडे, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीची कु. पायल चंदेल व कु. गौरी भाळवी, डी.सी.पी.ई., अमरावतीची कु. दवा पडेन शेर्पा, कु. नगवांग लहाडोन, कु. पुर्वा बोदलकर, कु. वर्षा सुब्बा व कु. महिमा बबनीकोट, डॉ.एच.एन. सिन्हा महाविद्यालय, पातुरची कु. कोमल ढोले व कु. शिवानी कोपुर, वत्सलाबाई नाईक महाविद्यालय, पुसदची कु. संजना माहुरे व कु. धनश्री जाधव, सिताबाई कला महाविद्यालय, अकोलाची कु. सविता नेमाडे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची कु. वैष्णवी वासनिक, मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हाची कु. कोमल भागवत व कु. कोमल उर्कुडे, जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदुर बाजारची कु. मोनिका कडू व कु. दीक्षा मानके, श्रीमती आर.डी.जी. महिला महाविद्यालय, अकोलाची कु. दीक्षा शर्मा.
टेबल टेनीस (महिला)
डी.सी.पी.ई. अमरावती येथील कु. लेकी भुतिया, कु. प्रितीभा मिंज, कु. साक्षी प्रियम व कु. अंशु कुमारी, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची कु. वैष्णवी ठाकरे, श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय, पुसदची कु. दिपाली गेडाम, प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक. अॅन्ड रिसर्च, बडनेरा रेल्वेची कु. मानसी नीलय.
सदर चमूत निवड झालेल्या सर्व खेळाडूंना सूचित करण्यात येते की, प्रशिक्षण वर्गाबाबत त्यांनी आपापल्या महाविद्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्यावतीने क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी कळविले असून काही अडचण असल्यास त्यांचेशी दूरध्वनी क्र. 9922930166 यावर संपर्क साधता येईल.