मराठी
काँग्रेसचे खासदार वसंत कुमार यांचे कोरोनामुळे निधन
नवी दिल्ली/दि.२८– देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 33 लाखांवर गेली आहे. तर 60 हजारांहून अधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे खासदार वसंत कुमार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.