मराठी

कोरोना ने मरणपावले १२ जणांचे मृतदेह नेले एकाच शववाहिकेत

अहमदनगर जिल्हातील घटना

अहमदनगर/दि.१०-निधन झाल्यानंतरही मृतदेहाची अवहेलनेतून सुटका होत नसल्याचे विदारक चित्र  नगर जिाले.  कोरोनामुळे निधन झालेल्या 12 जणांचे मृतदेह चक्क एकाच शववाहिकेतून वाहून नेण्याचा प्रकार रविवारी (9 ऑगस्ट) नगरच्या जिल्हा सरकारी घडला. या घटनेचे छायाचित्र शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी काढली आहेत. तातडीने रुग्णालयातील स्थिती सुधारली नाहीतर शिवसेनेतर्फे आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी मनपा आयुक्तांना एका पत्राव्दारे दिला आहे. मित्राच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाल्यावर त्यांच्यावर अंत्यविधी नीट होतात की नाही, हे पाहण्याच्या निमित्ताने नगरसेवक बोराटे रविवारी सिव्हील हॉस्पिटलला गेले होते. तेथील विदारक दृश्य पाहून त्यांनाच अस्वस्थ झाले. शववाहिकेत कोरोनामुळे मरण पावलेल्या 4 महिला व 8 पुरुषांचे मृतदेह अस्ताव्यस्त फेकून दिले गेले होते. कोरोनामुळे निधन झालेल्यांचे अंत्यविधी परस्पर होत असल्याने या निधन झालेल्यांचे कोणीही नातेवाईक तेथे नव्हते. शववाहिकेत हे 12 मृतदेह कोंबून त्यांना अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी नेण्याची तयारी सुरू होती. तो सगळा प्रकार पाहून तसेच मानवतेला काळिमा फासणारी आणि कोरोनामुळे निधन झालेल्यांची मृत्युनंतरही अवहेलना सुरू असल्याचे पाहून बोराटेंनी या प्रकाराचे फोटो मोबाईलमध्ये काढले. मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना बोराटे यांना पत्र पाठविले आहे.घडलेला प्रकार अत्यंत क्लेशदायक, धक्कादायक व मानवतेला काळिमा फासणारा आहे. माणसांची किंमत प्रशासनाला राहिली नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. यामुळे सिव्हीलमध्ये कोरोना उपचारांसाठी दाखल असलेल्यांवर तरी योग्य उपचार होतात की नाही, याचीही शंका येऊ लागली आहे, असे म्हणणे बोराटेंनी पत्रात मांडले आहे. प्रशासनाचा भोंगळ कारभार यातून स्पष्ट झाला आहे. दोन दिवसात या कारभारात सुधारणा झाली नाही तर वरिष्ठांकडे यासंदर्भात तक्रार करण्याचा व शिवसेनेद्वारे आक्रोश आंदोलन करण्याचा इशाराही बोराटेंसह नगरसेविका मंगला लोखंडे व शिवसेनेचे कार्यकर्ते विशाल वालकर यांनी दिला आहे. दरम्यान, सिव्हीलमध्ये कोरोना मृतदेहांची विटंबना होत असल्याचे दाखवणारी छायाचित्रे व्हॉटसअ?ॅपद्वारे व सोशल मिडियाद्वारे शहरभर सोमवारी व्हायरल झाली. या घटनेचा निषेध व्यक्त आहे. दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Back to top button