मराठी

लिव्ह इन राहणा-यांना विवाहाचे प्रशिक्षण !

रायपूर/दि. १७ – मोठ्या  शहरांबरोबरच आता ग्रामीण भागातही लिव्ह-इन रिलेशनशिपचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर आरसी चर्चने 12 जोडप्यांना लग्न करण्यासाठी समुपदेशन सुरू केले आहे. त्यासाठी त्यांचे प्रशिक्षण शिबीर घेतले जात आहे. आरसी चर्चच त्यात आघाडीवर आहे.
पुजारी जेव्हियर केरेकेट्टा यांच्या मार्गदर्शनाखाली मुरू येथील सारवदा चर्च कॅम्पसमध्ये १२ ख्रिश्चन जोडप्यांसाठी १४ दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. ठरवून लग्न होण्याच्या समारंभाच्या आधी दरवर्षी असे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जात असले, तरी लिव्ह-इनमध्ये राहणा-या 12 जोडप्यांना प्रथमच विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. या जोडप्यांव्यतिरिक्त, तीन सामान्य जोड्यांचेदेखील प्रशिक्षण घेतले जात आहे. ही जोडपीही पूर्वनियोजित विवाह समारंभात विवाहबद्ध होतील. लिव्ह-इन जोडप्यांचा विवाह 23 डिसेंबर रोजी होईल. इथली काही जोडपी दहा वर्षांपासून लग्नाशिवाय एकत्र राहत आहेत. ग्रामीण भागात त्यांना ‘धुकू’ असे म्हणतात.
एका जोडप्याने सांगितले, की लग्नाच्या सोहळ्याची सामाजिक परंपरा नुकतीच पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याने आम्हाला आनंद झाला. विवाह सोहळ्यापूर्वी जोडप्यांनी आपल्या मुलांचे संगोपन करण्यापासून विवाहित जीवनातील विविध पैलूंबद्दल ‘वेडिंग धर्म वर्ग’ जागृत केले. लग्नानंतरचे जीवन सुखी बनविणे हा त्याचा हेतू आहे. सरावडा चर्चचे पल्ली पुरोहित फादर जेव्हियर केरकेट्टा म्हणाले, की आम्ही निवडलेल्या १२ जोडप्यांना विवाहसोहळ्यापासून ते लग्नापर्यंतच्या इतर सर्व बाबींची जाणीव करून देत आहोत, जेणेकरुन ते लग्नानंतर आनंदी वैवाहिक आयुष्य जगू शकतील.

Related Articles

Back to top button