स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ऊर्जा संवर्धन सप्ताह कार्यक्रम
मनपा हिंदी कन्या माध्यमिक शाळा नागपुरी गेट येथे उत्साहात संपन्न..
अमरावती/डी. २१- मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी व्हावे जुनियर कॉलेज निर्माण—-सभापती आशिषकुमार गावंडे… विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी व ऊर्जेचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त ऊर्जा कशी वाचवता येईल याची जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संपूर्ण भारतामध्ये आजादी का अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात सर्व शासकीय प्रशासकीय विभागांमध्ये साजरा करण्यात येत आहे. तसेच ऊर्जा संवर्धन सप्ताह सुद्धा अनेक विभागांमध्ये राबविणे सुरू आहे. याच अनुषंगाने दिनांक 21 डिसेंबर 2019 रोजी मनपा हिंदी कन्या माध्यमिक शाळेच्या प्रांगणामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ऊर्जा संवर्धन सप्ताह विविध स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला. ऊर्जा संवर्धन सप्ताहांतर्गत नाट्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा व इतर स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मनपाचे शिक्षण समिती सभापती आशिषकुमार गावंडे यांच्या हस्ते आद्यशिक्षीका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून झाली यानंतर प्रमुख पाहुणे शिक्षण सभापती आशिष गावंडे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, शिक्षण अधिकारी डॉक्टर अब्दुल राजिक व इतर मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सौ राजश्री कुलकर्णी व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री पंकज मेश्राम यांनी केले. उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी सर्व पालकांना आव्हान केले की ज्या पद्धतीने आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने मनपाच्या शाळांना मदत करावी. शिक्षण सभापती आशिषकुमार गावंडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत बोलले की शिक्षणा सोबतच मैदानी खेळ सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी खेळावे, जेणेकरून सर्वांचे आरोग्य तंदुरुस्त राहील व आपण कोर कोरोना सारख्या महाभयंकर आजाराला बळी पडणार नाही. मनपाचे विद्यार्थी अतिशय हुशार असून अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रातील मनपा शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्युनिअर कॉलेज ची निर्मिती व्हावी अशी इच्छा आशिष गावंडे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. यानंतर विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. ज्यामध्ये एपीजे अब्दुल कलाम ग्रुपच्या सानिया आनम व कैकशा परवीन यांना प्रथम पारितोषिक मिळाले. आईन्स्टाईन ग्रुप च्या अनसार डाली, शेख अल्फाज यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच न्यूटन ग्रुपच्या अल्सफा व आलपिया यांना तृतीय क्रमांक पटकाविला .घोषवाक्य स्पर्धेमध्ये महेक परविन व शेख युसुफ यांचा प्रथम क्रमांक आला. महक अंजुम आणि अब्दुल जहीर हिचा द्वितीय क्रमांक आला. वकृत्व स्पर्धेमध्ये कुमारी साम्या मुमताज खान, जुन्या फातिमा कैकशा परवीन, आलिया कौसर सय्यद शहजाद, अल्फिया शेख iqrar यांनी पारितोषिक मिळविले. प्रश्नमंजुषा स्पर्धा मध्ये साम्या मुमताज खान, आयशा फातिमा, आफ्रीन फातेमा, महेक नाज, शेख आयुब, आरसी अनम, तसलीम अंजुम इत्यादी विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली शिक्षण सभापती आशिष कुमार गावंडे यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ही बक्षीस वितरण करण्यात आली. गावंडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे कौतुक केले. ऊर्जा प्रकल्प अधिकारी श्री हर्षल काकडे, माजी नगरसेवक अहमद भाई, प्रमोद शेगोकार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर प्रकाश मेश्राम यांचे मोलाचे योगदान मिळाले. कार्यक्रमाला मनपा हिंदी प्राथमिक शाळा क्रमांक 12 चे मुख्याध्यापक श्री नाईक सर, सावंत सर, घाटोळ मॅडम, कु निखत परवीन, अनिता भांगे, भावना बडे, शुभम देशमुख, व इतर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंगला व्यास मॅडम यांनी केले.