मराठी
मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयाकरिता ४९ कोटी २३ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता !
आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांना यश !
५० खाटांच्या रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन !
अमरावती/दि ११- मोर्शी तालुक्याचा विस्तार आणि वाढलेली लोकसंख्या विचारात घेता मोर्शी तालुक्यातील नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सेवा शहरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार देवेंद्र भुयार हे आग्रही होते. मोर्शी तालुक्याला गेले अनेक वर्षे चर्चा अन् प्रतीक्षाच ठरलेल्या मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाला ५० खाटांच्या रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन होण्यासाठी कंबर कसल्यामुळे अखेर आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मंजूर झाले असून मोर्शी येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, मुख्य इमारतीच्या बांधकामा करीता ४९ कोटी २३ लक्ष रुपयांच्या प्राथमिक अंदाजपत्रक व आराखडयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मोर्शी येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, मुख्य इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन मोर्शी येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, मुख्य इमारत बांधकामा करीता ४९ कोटी २३ लक्ष रुपयांच्या प्राथमिक अंदाजपत्रक व आराखडयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मोर्शी येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, मुख्य इमारत बांधकामाचे अंदाजपत्रकामध्ये इमारतीचे बांधकामासह (तळ व तिसरा मजला १०७८३.७७ चौ.मी.) फ्युल गॅस पाईपलाईन, बायो डायझेस्टर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर छप्पर, फर्निचर, संरक्षण भिंत व गेट विदयुतीकरण, पाणी पुरवठा व मल:निस्सारण, आग प्रतिबंधक, व लिफ्ट इ. साठी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार मुख्य इमारत बांधकामा करीता शासन निर्णयामध्ये ४९ कोटी २३ लक्ष रुपयांच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
मोर्शी तालुक्यातील नागरिकांना सर्व वैद्यकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास पाठपुरावा केल्यामुळे
लवकरच या कामाला सुरुवात होणार असून हे काम पूर्णत्वास जाणार आहे. सद्य:स्थितीत मोर्शी येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहे. या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारत बांधकामा करीता प्राथमिक अंदाजपत्रक व आराखडयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आल्यामुळे मोर्शी शहरात १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय होणार असल्याने शहराबरोबरच तालुक्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले .