अशोक लेलंड ट्रक कंपनीचा अनागोंधळ कारभार
यवतमाळ। २२ नोव्हेंबर : यवतमाळ जिल्ह्यातील अशोक लेलंड कंपनीचे मिनी ट्रक बरेच प्रमाणात येथील वाहन धारकांनी खरेदी केलेले आहेत. परंतु या जिल्ह्यामध्ये अशोक लेलंड कंपनीचे शोरुम किंवा गाडी सव्र्हिसींग साठी वर्कशॉप नसल्यामुळे वाहन धारकांना आपला ट्रक सव्र्हिसींग साठी व इतर किरकोळ कामासाठी नागपुर येथील लेलंड कंपनीच्या वर्कशॉप मध्ये न्यावा लागतो. ही वाहन धारकांसाठी फार मोठी दुर्देवी बाब आहे. जिल्ह्यात लेलंड कंपनी वाहन विक्री करीत असेल तर ग्राहकांना येथे सुविधा देणे बंधनकारक आहे.
यवतमाळ येथील ओमसाई ट्रॉन्सपोर्टचा अशोक लेलंड कंपनीचा मिनी ट्रक अशोक लेलंड, वाकी, नागपूर येथे सव्र्हिसिंग व इतर किरकोळ कामासाठी पाठविण्यात आला. गाडीचे बिल ११,४०० रुपये काढले ड्रायव्हर कडे पैसे कमी असल्यामुळे ओमसाई ट्रॉन्सपोर्ट यांनी कंपनीच्या खात्यात ५ हजार रुपये टाकले व उर्वरीत रक्कम रुपये ६४०० ड्रायव्हरने नगदी भरले. परंतु ड्रायव्हरनी काही दहाच्या नोटा दिल्यामुळे कंपनीने दहाचे नोटा घेत नाही म्हणून उर्वरीत रक्कम रुपये ६४०० परत केले. आज जवळपास पाच दिवसापासुन ओमसाई ट्रान्सपोर्ट, यवतमाळ यांचा मिनी ट्रक अशोक लेलंड कंपनी, अमरावती रोड, वाकी नागपूर येथे अडवून ठेवलेला आहे. त्यामुळे ओमसाई ट्रॉन्सपोर्ट चे फार नुकसान होत आहे. अशोक लेलंड कंपनी फक्त आपला ट्रक विकणे एवढाच व्यवसाय करु पाहत आहे. व ग्राहकांना काहीच सुविधादेत नाही. जर अशोक लेलंड कंपनी ग्राहकांना योग्य सुविधा देत नसेल तर या कंपनीचा ट्रक खरेदी करण्यात काय उपयोग असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे.
अशोक लेलंड कंपनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी महीन्द्रा फायनांन्स, श्रीराम फायनांन्स, चोला मंडलम् फायनांन्स, एच.डी.एफ.सी. फायनांन्स, अेयु फायनांन्स, इंडसेन फायनांन्स, अॅक्सीस बँक, यवतमाळ, अर्बन बँक यांचे मार्फत ग्राहकांना कर्ज उपलब्ध करुन देते व त्यामुळे ग्राहकांची सुविधा अभावी फसवणुक होते. त्यामुळे अशोक लेलंड वाहनांची खरेदी करण्यासाठी कोणत्याही फायनांन्स कंपनीने फायनांन्स करुन आपल्या ग्राहकांना अडचणीत आणु नये तसेच अशोक लेलंड कंपनीच्या ट्रकला आपली फायनांन्स सुविधा बंद करावी जेणेकरुन आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना त्रास होणार नाही व अशोक लेलंड कंपनीविरोधत उचित कार्यवाही करण्यात येईल असा इशारा शैलेशभाऊ गाडेकर शिवसेना जिल्हा प्रमुख, वाहतुक शाखा, यवतमाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केलेला आहे.