मराठी

कोरोनाचे संकट टळू दे रे महादेवा !

निलेश विश्वकर्मा यांचे नंदीराजाला साकडे

  • पोळ्यानिमीत्त बैलजोडीचा केला सन्मान

चांदूर रेल्वे:-  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत बैलपोळा सणाच्या निमित्ताने चांदूर रेल्वे येथील बैलजोड्यांचा सन्मान करून सामाजिक क्षेत्रातील अग्रणी निलेश विश्वकर्मा यांनी सध्याच्या काळात समस्त मानव जातीवर कोसळलेले कोरोना महामारीचे संकट टळू देण्याची प्रार्थना नंदीराजाच्या मार्फत देवाधिदेव महादेवाला केली आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पोळा सण दरवर्षी निलेश विश्वकर्मा यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी रक्षाबंधन आणि पोळा या दोन्ही सणांचे उत्सव साजरे होऊ शकले नाहीत. शेतकरी राजाला भरघोस उत्पादन मिळवून देण्यात नंदिराजाचा मोठा हात असतों. वर्षभर शेतात राबणाऱ्या या बैलजोडीसाठी पोळा म्हणजे सन्मानाचा दिवस असतो. त्यामुळे आपण आपल्या बळीराजाच्या या सच्चा साथीदारांचा सन्मान केला पाहिजे असे विश्वकर्मा यावेळी म्हणाले.
संकट अद्याप टळलेले नसल्याने ते लवकरात लवकर दूर व्हावे, पुन्हा एकदा समस्त मानवजातीचे कल्याण व्हावे, सर्वांचे जीवन सुखी आणि समृद्ध व्हावे अशी प्रार्थना विश्वकर्मा यांनी नंदिराजाची पूजा करताना केली आहे. आज सायंकाळी विश्वकर्मा यांनी सपत्नीक बैल जोडीला साज शृंगार चढवून त्यांचा सन्मान केला आहे. यावेळी अनेक शेतकरी बांधवांचा देखील सन्मान विश्वकर्मा यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी गावातील नागरिक देखील उपस्थित होतें.

Related Articles

Back to top button