बेनोडा (शहीद) पोलिसांच्या सर्तकतेने कत्तलीकरिता जाणा:या २५ गोवंशांना मिळाले जीवनदान
वरुड .प्रतिनिधी। २ नोव्हेंबर – बेनोडा (शहिद) बसस्थानक परिसरात पोलिसांची मोटर वाहन कायद्यार्तगत कार्यवाही सुरु असतांना गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी वाहनातुन नेत असतांना आढळुन आल्यावरुन पोलिसांनी वाहनासह २५ गोवंशांना ताब्यात घेऊन जीवनदान दिल्याने बेनोडा (शहीद) पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेनोडा (शहीद) बसस्थानक परिसरात मोटर वाहन कायद्याअंर्तगत कार्यवाही सुरु असतांना एका १२ चक्का ट्रकमधून कत्तलीसाठी बैल नेत असल्याचे लक्षात आल्यावरुन बेनोडा (शहीद)पोलिसांनी सापळा रचला असता आरोपी हा त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम.एच.२४ जे ८०७१ हे वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत असताना दिसून आला पोलिसांनी त्याला थांबवुन वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये काही गोवंश जनावरे निर्दयतेने कोंबुन जनावरांची चारा पाण्याची व्यवस्था न करता जनावरांना वेदना होतील अशा पद्धतीने काहीही हालचाल न करता कोंबुन वाहतुक करीत असतांना मिळुन आले.
या प्रकरणी बेनोडा (शहीद) पोलिसांनी पो.कॉ.गजानन कडु यांचे फिर्यादीवरुन मोबिन खान अखलील खान वय ३० वर्ष सोबत अधिक ३ ईसम सर्व रा.नांदेड यांचे विरुद्ध कलम (११), (१)(घ)(ड)(च) प्राण्यांना निर्दयतेने वाहतुक प्रतिबंद अधिनियम १९६० सहकलम ५ अ, ९० महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. यावेळी १० लाख रुपये किमतीचे वाहन व २ लाख ५७ हजार रुपये किंमतीचे २५ बैल असा एकुण १२ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कार्यवाही बेनोडा (शहीद)चे ठाणेदार मिलिंद सरकटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणपत पप्पुलवार, हे.कॉ.दिपक काळे, गजानन कडु, सुभाष शिरभाते आदींनी केली. या कार्यवाहीमध्ये वाहनासह बैलांना ताब्यात घेऊन जीवनदान दिल्याने बेनोडा (शहीद) पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.