नवी दिल्ली/दि. १८ – गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची परवानगी आता मेघालयात करण्यात आली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आता गोव्याचेही कामकाज हाताळणार आहेत. राष्ट्रपती भवनाकडून ही माहिती देण्यात आली. सत्यपाल मलिक यांनी जम्मू- काश्मीरच्या राज्यपालपदाचीही जबाबदारी अनेक महिने हाताळली. त्यानंतर २५ ऑक्टोबर २०१९ रोजी त्यांना गोव्यात धाडण्यात आले. आता त्यांची नवी नियुक्ती मेघालयात करण्यात आली. पश्चिम उत्तर प्रदेशच्या बागपतचे रहिवासी असलेल्या सत्यपाल मलिक यांना भाजपने अगोदर बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांना जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल बनवण्यात आले होते. जम्मू काश्मीरमध्ये मलिक राज्यपाल असतानाच असतानाच अनुच्छेद ३७० हटवण्यात आले. या वेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. जम्मू काश्मीरचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्यात आल्यानंतर मलिक यांना गोव्यात धाडण्यात आले.