मराठी

भाजपा अमरावती शहर कार्यकारणी जाहीर

देशमुख, खताडे, खोंडे महामंत्री

अमरावती:-अमरावती शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी सोमवारी कार्यकारणी जाहीर केली आहे. या कार्यकारणीमध्ये तीन महामंत्री, 10 उपाध्यक्ष, 10 सचिव नियुक्त करण्यात आले असून महिलांना 30 टक्के प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे.

संघटन महामंत्री म्हणून गजानन देशमुख तर दिपक खताडे, मंगेश खोंडे यांची महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी प्रा. संजय तिरथकर, विनय नगरकर, धिरज बारबुद्धे, सतिश करेसीया, डॉ. प्रणय कुळकर्णी, राजु राजदेव, गंगा खारकर, शिल्पा पाचघरे, रिता मोकलकर, सचिन रासने यांची तर सचिव म्हणून सुनील जावरे, वनमाला सोनोने, पद्मजा कौंडण्य, पंचफुला चव्हाण, डॉ. मिलिंद चव्हाण, अजय गोंडाणे, सुहास ठाकरे, राजु लिखीतकर, भारत चिखलकर, किशोर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी शंकरलाल बत्रा, कार्यालय मंत्री राजेश आखेगांवकर, सोशल मिडीया प्रमुख म्हणून दिपक पोहेकर यांची नियुक्ती केली आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी लता देशमुख, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणीत सोनी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विवेक चुटके, अनुसुचीत जाती मोर्चा अध्यक्ष प्रकाश डोफे, किसान मोर्चा अध्यक्षपदाची जबाबदारी शालिग्राम नांदे सांभाळणार आहे.

आमदार प्रवीण पोटे, माजी आमदार डॉ. सुनील देशमुख, प्रा. रविंद्र खांडेकर, जयंत डेहणकर, शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय, महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समिती सभापती राधा कुरील व पक्षनेता सुनील काळे, डॉ. नितीन धांडे, डॉ. प्रदीप शिंगोरे, मधुभाऊ उमेकर, संध्या टिकले हे कार्यकारणीचे कायम निमंत्रीत सदस्य राहणार असून सर्व नगरसेवकांना विशेष निमंत्रित म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय 91 कार्यकर्त्यांचा कार्यसमितीत समावेश आहे. कार्यकारणी बनविताना सर्व समाजाला न्याय देण्यासोबतच जुने व नवीन कार्यकर्त्यांचा समावेश करून ती सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 

 

Related Articles

Back to top button