मराठी

भाजप आणणार अविश्वास ठराव

गेहलोत सरकारची कसोटी; आजपासून विधिमंडळाचे अधिवेशन

जयपूर/दि.१३ – राजस्थानचे विधानसभेचे अधिवेशन उद्या (ता. १४)पासून सुरू होणार आहे. विधानसभेत भाजपने अशोक गेहलोत सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या दोन्ही गटांचे मनोमिलन झाल्यासारखे असून अविश्वास ठराव फेटाळला जाण्याची शक्यता आहे.

माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि त्यांच्या सहका-यांच्या घरवापसीला मुख्यमंत्री गेहलोत गटांची हरकत होती. तसेच गेहलोत यांनी पायलट यांच्याविषयी अपशब्द वापरले होते; परंतु ३२ दिवसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पायलट यांच्यांशी चर्चा केली. दोन्ही गटांतील सामंजस्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली. गेहलोत यांनीही आता आमदारांचा विरोध असताना पायलट यांच्यांशी जुळवून घेण्याचे संकेत दिले. त्यानुसार त्यांनी दोन्ही गटाची बैठक घेतली. मुख्यमंत्री म्हणून आमदारांची नाराजी दूर करणे हे माझे कामच आहे, असे सांगून काहीसे नमते घेतले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत कोणताही वाद घालायचा नाही, अशा स्पष्ट सूचना काँग्रेसने दोन्ही गटांना दिल्या.

गेहलोत सरकार पडू नये, म्हणून आतापर्यंत वसुंधराराजे यांनी गेहलोत यांना पडद्याआडून मदत केली. आता सरकार वाचणार असे लक्षात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, काँग्रेसने जनतेचे नव्हे, तर स्वतःचे हीत सांभाळले. राजस्थानमध्ये आम्ही १० वर्षे बरेच काम केले. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर आमच्या योजनांची नावे बदलली qकवा बंद केली गेली. आता आम्हाला केंद्राचे काम लोकांपर्यंत न्यायचे आहे. काँग्रेसच्या राजकीय संकटानंतर वसुंधरा राजे पहिल्यांदा जयपूरला पोहोचल्या. यापूर्वी ११ ऑगस्ट रोजी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती; परंतु वसुंधरा हजर राहिल्या नव्हत्या. आजच्या बैठकीत १४ ऑगस्टपासून सुरू होणा-या विधानसभा अधिवेशनासाठी रणनीती आखली गेली. दरम्यान, गेहलोत म्हणाले, की गेल्या एका महिन्यात काँग्रेसमध्ये जे काही गैरसमज झाले ते आपल्याला देशाचे, राज्यातील लोकांचे हीत लक्षात घेऊन दूर करणे आवश्यक आहे. राजस्थानमधील काँग्रेसचे राजकीय संकट संपुष्टात आले असले, तरी गेहलोत आणि पायलट गटाच्या आमदारांत तयार झालेली दरी दूर करण्याचे मोठे आव्हान आहे.

 

लोकशाही वाचविण्यासाठी नाराजी विसरा

गेहलोत गटातील आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पायलट गटाशी समझोता करण्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर गेहलोत म्हणाले, की जे घडले ते विसरून जा. माफ करा आणि पुढे जा. आमदारांनी नाराज होणे स्वाभावीक आहे. संतापलेल्या आमदारांना मी समजावून सांगितले आहे. लोकशाही वाचविण्यासाठी ब-याचदा आपल्याला अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. आता सर्वांनी एकत्रितपणे राज्याच्या विकासासाठी काम करू, अशी आशा गेहलोत यांनी व्यक्त केली.

Related Articles

Back to top button